नगरसेवकाच्या विरोधात उपनगराध्यक्षाची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:30+5:302021-07-26T04:26:30+5:30
राजुरा : नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी एका व्हॉटसॲप ग्रुपवर पोस्ट टाकून आपली बदनामी केल्याची तक्रार उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी ...
राजुरा : नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी एका व्हॉटसॲप ग्रुपवर पोस्ट टाकून आपली बदनामी केल्याची तक्रार उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी राजुरा पोलिसात केली आहे.
राजुरातील सुनील देशपांडे हे न.प राजुराचे विद्यमान उपनगराध्यक्ष आहेत. तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे राजुरा शहरात सगळीकडे पाणी साचले होते. नाका नं. ३ जवळील भवानी नाल्याच्या बाजूला असलेल्या भंगार दुकानातील एक कर्मचारी पुराच्या पाण्यात अडकलेला होता. त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढत जात असल्याने, सदर इसमाचा जीव धोक्यात आलेला होता. अशा प्रसंगी त्या इसमाला नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प राजुराने कार्यतत्परता दाखवून सुरक्षितपणे बाहेर काढले. या संबंधीची पोस्ट देशपांडे यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याच दिवशी टाकली. याच ग्रुपवर नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी एक पोस्ट टाकून आपली बदनामी केली व मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार देशपांडे यांनी केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे करीत आहेत.