रेती तस्करांचा नायब तहसीलदारावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:35+5:30
जमनजेट्टी परिसरातून रेती तस्करी सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली. माहितीच्या आधारे एक पथक जमनजेट्टी परिसरात गेले. यावेळी कुंदन साव याच्या मालकीचा एमएच ३४ एडी ५६२ क्रमांकाचा हॉप टन, राजू होकम याच्या मालकीचा एमएच ३४ एबी ३०९०, राकेश देशमुख यांच्या मालकीच्या एमएच ३४ एल ८८५७ क्रमाकांच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील जमनजेट्टी परिसरातील रेती तस्करांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी साबिर सिद्धीकी, जहागीर सिद्धीकी रा. लालपेठ कॉलरी यांच्यासह चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जमनजेट्टी परिसरातून रेती तस्करी सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली. माहितीच्या आधारे एक पथक जमनजेट्टी परिसरात गेले. यावेळी कुंदन साव याच्या मालकीचा एमएच ३४ एडी ५६२ क्रमांकाचा हॉप टन, राजू होकम याच्या मालकीचा एमएच ३४ एबी ३०९०, राकेश देशमुख यांच्या मालकीच्या एमएच ३४ एल ८८५७ क्रमाकांच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी सुरू होती. पथकाने या वाहनांच्या मालकांवर कारवाई करीत वाहन जप्त केले. दरम्यान, लालपेठ येथील जहागीर सिद्धीकी याच्या मालकीचा एमच ३४-४००६ या कमांकाच्या हॉफटनद्वारे रेती तस्करी करीत असताना पथकाने ट्रकला पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला.
मात्र सिद्धीकी याच्यासह वाहनचालकाने पथकाला शिवीगाळ तसेच मारहाण केली.
नायब तहसीलदार धांडे यांनी शहर ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी साबिर सिद्धीकी, जहगीर सिद्धीकी तसेच वाहन चालकावर ३५३, ३३२, १८६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत ठाकरे करीत आहेत.