दिल्लीत ‘डेरा डालो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:44 AM2017-11-08T00:44:33+5:302017-11-08T00:44:44+5:30
देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
भाजपा सरकारने निवडणुकीत शेतकरी व जनतेला दिलेले आश्वासन फोल ठरले. सत्ताबदल होऊनही शेतकरी संकटात आहे. डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा हवेत विरली. शेतकºयांची सरसकट कर्जमाफीचे दावे खोटे ठरत आहेत. जबरान जोतधारकांना जमिनीचे पट्टे मिळाले नाही. वयाच्या ६० वर्र्षांनंतरही शेतकरी शेतमजूर व असंघटीत कामगारांना मासिक पाच हजार रुपये पेंशनचा कायदा केला नाही. त्यामुळे या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. परंतु, कर्जमाफी अजूनही मिळाली नाही. कर्जमाफीसाठी नको त्या जाचक अटी शेतकºयांवर लादण्यात आल्या. सरकारच्या धोरणामुळे शेतकºयांच्या आत्महत्या अजूनही सुरू आहेत. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास शेतकºयांचे कल्याण होईल. परंतु, या शिफारशींची अंमलबजावणी करू शकत नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात लिहून दिले आहे. महाराष्ट्रातील हजारो जबरानजोत धारकांना जमिनीच्या पट्ट्यापासून वंचित ठेवले आहे. गैरआदिवासी जबरानजोत धारकांना तीन पिढ्यांची जाचक अट (७५ वर्ष) लावण्यात आली. ती त्वरित रद्द करून सर्वांना जमिनीचे पट्टे व सात- बारा देण्यात यावा, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करावी, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमीभाव देण्यात यावा, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे. शेतकºयांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, भूसंपादन कायदा २०१३ ची काटेकोर अंमलबजावणी करावी, मायक्रोफायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करून बळजबरीने वसुल करणाºयांवर कायदेशिर कारवाई करावी, आदी आदी मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.
आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल अंजान, राज्य महासचिव नामदेव गावंडे, डॉ.महेश कोपुलवार, विनोद झोडगे, बाळकृष्ण दुमाने, मनोहर आदे, सुधीर खेवले, रामदास कामडी, भोजराज मैन्द यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली व मूल तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.