पात्र असूनही वृद्ध महिला घरकुल योजनेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:52 PM2018-07-11T22:52:08+5:302018-07-11T22:52:33+5:30
सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेंढरी (कोके) येथील ओबीसी व इतर लाभार्थी घरकुलापासून आजही वंचित आहेत. यात येथील अंत्योदय योजनेचा लाभ घेत असलेल्या व निराधार मायाबाई दादाजी शेंडे यांचे घर पडण्याच्या स्थितीत असतानाही त्यांना शासनाकडून घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. मुसळधार पावसात त्यांचे घर कोसळल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेंढरी (कोके) : सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेंढरी (कोके) येथील ओबीसी व इतर लाभार्थी घरकुलापासून आजही वंचित आहेत. यात येथील अंत्योदय योजनेचा लाभ घेत असलेल्या व निराधार मायाबाई दादाजी शेंडे यांचे घर पडण्याच्या स्थितीत असतानाही त्यांना शासनाकडून घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. मुसळधार पावसात त्यांचे घर कोसळल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रस्तुत प्रतिनीधीने प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली असता, त्यांचे मातीचे व कुळाचे घर दोन्ही बाजुने खचले आहे. भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. मात्र पर्याय नसल्याने त्या अजुनही आपल्या कुटुंबासह पडक्या घरातच राहतात. पावसाळ्यात घर पडले आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना इजा झाल्यास कोण जबाबदार असे कुटुंबीयांनी सांगितले.
बऱ्याच वर्षापासून आपण घरकुलाची मागणी करीत आहे. परंतु, कोणीच माझ्या मागणीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मला अजूनपर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नाही.
- मायाबाई शेंडे, पीडित.