तक्रार करूनही अन्न व औषध पुरवठा विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:01:16+5:30

विभाग आपले कर्तव्य बजावण्यासाठी नेहमी सतर्क असतो तो तक्रारीची वाट बघत नाही. मात्र तक्रार आल्यानंतर कारवाई करायची मानसिकता नसली तरी तक्रारकर्त्यांच्या समाधानासाठी दखल घेतल्याचा बनाव करतात. परंतु प्रत्यक्ष तक्रार केल्यानंतरही या विभागाच्या येथील प्रमुखाने दुर्लक्ष केल्याचा आरोप विनोद बुटले नामक तक्रारकर्त्याने ‘लोकमत’ला पाठविलेल्या पत्रातून केला आहे.

Despite the complaint, the Food and Drug Administration ignored the action | तक्रार करूनही अन्न व औषध पुरवठा विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष

तक्रार करूनही अन्न व औषध पुरवठा विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देतक्रारकर्त्याचे लोकमतला पत्र : साठेबाजांसोबत सोनटक्के नामक अधिकाऱ्याचे मधूर संबंध

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सुगंधित तंबाखू साठेबाजांनी काळ्याजाबारात इतकी उंची का गाठली, याचे बिंग ‘लोकमत’ने ग्राऊंड रिपोर्टच्या माध्यमातून फोडताच जिल्ह्यातील विविध कोपऱ्यातून अन्न व औषध पुरवठा विभागाबाबत तक्रारकर्ते नागरिक आता खुलेआम बोलायला लागले आहे. असेच एक पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. या पत्रानुसार सदर व्यक्तीचे स्वत: अन्न व औषध पुरवठा विभागाचे सहआयुत्तांना सुगंधित तंबाखूच्या साठ्याबाबत माहिती दिली. जो विभाग आपले कर्तव्य बजावण्यासाठी नेहमी सतर्क असतो तो तक्रारीची वाट बघत नाही. मात्र तक्रार आल्यानंतर कारवाई करायची मानसिकता नसली तरी तक्रारकर्त्यांच्या समाधानासाठी दखल घेतल्याचा बनाव करतात. परंतु प्रत्यक्ष तक्रार केल्यानंतरही या विभागाच्या येथील प्रमुखाने दुर्लक्ष केल्याचा आरोप विनोद बुटले नामक तक्रारकर्त्याने ‘लोकमत’ला पाठविलेल्या पत्रातून केला आहे.
जिल्ह्यातील सुगंधित तंबाखूचा काळाबाजार नेमका कुणामुळे चालतो, या दृष्टीने हे पत्र बरेच काही सांगून जाते. ‘लोकमत’ने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर या साठेबाजांची आपला धंदा पूर्ववत सुरू राहावा, यासाठी धडपड सुरू झालेली आहे. ज्या धंद्याला प्रतिबंध आहे. तरीही हा धंदा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या डोळ्यादेखत सुरू होता. लॉकडाऊन झाले. शासनाने संचारबंदीचे आदेश बजावल्यापासून अन्य एकही व्यावसायिक आपले प्रतिष्ठान उघडत नव्हते हे वास्तव आहे. प्रशासनाच्या एकेका निर्देशाची ही मंडळी इमाने-इतबारे वाट बघत होते. त्यांना आपल्या कुटुंबाचे पोटपाणी असतानाही या व्यावयायिकांनी दुकाने प्रामाणिकपणे बंद ठेवली. तंबाखूची दुकानदारी शासनाने लॉकडाऊनपूर्वीपासूनच बंद केली आहे. तरीही ही मंडळी एखाद्या विभागाच्या कोणी सोनटक्के नामक अधिकाºयामुळे आपला धंदा राजरोसपणे चालवित असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. इचकेच नव्हे, तर ‘लोकमत’ला आलेल्या असंख्य फोनमध्ये सोनटक्के नावाच्या अधिकाºयाचे तंबाखू साठेबाजांसोबत मधूर संबध असल्याचे सांगितले जात आहे. हा अधिकारी केंद्र व राज्य शासनाच्या आदेशापेक्षा मोठा आहे का? असा सवाल यामाध्यमातून उपस्थित केला जात आहे. एखादा अधिकारी, अधिनस्त अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर शासकीय कामात गडबड केल्यास कार्यवाहीला सामोरे जावे लागते. एखादा विभाग कर्तव्य बजावण्यास असमर्थ असेल त्या विभागाचे प्रमुख अधिकारीही जबाबदार ठरतो, अशी अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.

Web Title: Despite the complaint, the Food and Drug Administration ignored the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.