प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विस्तार होऊनही कर्मचारी आकृतिबंध जुनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:33 AM2021-09-17T04:33:27+5:302021-09-17T04:33:27+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २-१११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग ...
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २-१११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग १- १, गट ब वर्ग २ -१८, वर्ग ३- ६०२, वर्ग ४ - ३११ असे एकूण १०८९ पदे मंजूर आहेत. कर्मचाऱ्यांची पदे नियुक्त करण्यासाठी लागू केलेल्या आकृतिबंधाला बरेच वर्षे झाली. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. ही लोकसंख्या आता २५ लाखांच्या घरात गेली आहे. परंतु, राज्य शासनाने नवीन आकृतिबंधानुसार कर्मचाऱ्यांची पद भरती केली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विस्तार झाला. उपजिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट, ग्रामीण रुग्णालयात सुविधांमध्ये वाढ करूनही कर्मचारी भरतीचा आकृतिबंध अजूनही बदलविण्यात आला नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. ही समाधानाची बाब असली तरी आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण, रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील जुन्या आकृतिबंधानुसार मंजूर पदे आणि प्रत्यक्षातील नियुक्तीबाबत मोठी तफावत आहे. ही तफावत दूर झाल्यास उपचारासाठी बेताची आर्थिक स्थिती असणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची आवश्यकताच भासणार नाही.
बॉक्स
आकृतिबंधाच्या बदलासाठी पाठपुरावा कोण करणार ?
ओपीडीत उपचार घेणाया रुग्णांची संख्या वाढली. जिल्ह्यातील रुग्णालयांत ४६२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जुन्याच आकृतिबंधावर कर्मचारी भरती कायम असल्याने प्रशिक्षित मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होतो. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या जुन्या आकृतिबंधात बदल करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाने नेटाने पाठपुरावा करण्याची गरज आहे.
बॉक्स
पदभरती अर्ज छाननी प्रक्रियेत
जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीसीसी सेंटर वाढविले. प्रशिक्षण देऊन कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. वर्ग एक, दोन, तीन व चार श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदे भरली नाहीत. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या ड वर्गातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. पात्र उमेदवारांनी अर्जही सादर केले. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. त्यानंतर परीक्षा होतील. या प्रक्रियेला बराच कालावधी लागू शकतो. सध्या तरी रुग्णसेवा देताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण असल्याची माहिती सूत्राने दिली.
ग्रामीण रुग्णालयनिहाय रिक्त पदे
मूल १९
वरोरा ५७
चिमूर ४६
राजुरा ५०
भद्रावती ०६
बल्लारपूर ०५
गोंडपिपरी ०९
गडचांदूर ०८
नागभीड १०
सावली १०
ब्रह्मपुरी ०१
सिंदेवाही ०९
कोरपना ०९
चंद्रपूर २२३
.................