निराधारांना तीन महिन्यांपासून अनुदान नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:23+5:302021-09-24T04:32:23+5:30
बल्लारपूर : संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ...
बल्लारपूर : संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना त्वरित अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन तहसीलदांना देण्यात आले आहे.
शिष्टमंडळात शिवचंद द्विवेदी, स्वामी रायबाराम, गणेश चौधरी, किशोर मोहुर्ले, देवा वाटकर, श्रीनिवास सुंचुवार आदींचा समावेश होता.
शिष्टमंडळाने यावेळी रेशन कार्ड हा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ज्यामुळे केवळ रेशन दुकानातून स्वस्त धान्य उपलब्ध होत नाही. तर इतर सर्व सरकारी योजना आणि वैद्यकीय सेवांमध्ये रेशन कार्ड मागितले जाते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून ज्यांचे रेशन कार्ड पूर्णपणे अप्रचलित झाले आहेत. त्यांना नवीन शिधापत्रिका द्याव्या, अशी मागणीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नवीन रेशन कार्ड तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाल योजना हा गरीब, वृद्ध आणि विधवा महिलांचा आर्थिक आधार आहे. या मासिक मदतीने ते त्यांचा खर्च भागवतात. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने या योजनांचे लाभार्थी आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत. अनेक लाभार्थी आजारी आहेत. त्यांना औषधे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज आहे; पण बँकांमध्ये फेऱ्या मारूनही अनुदान मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अनुदान त्वरित देण्याची मागणी करण्यात आली.