गोंडकालिन किल्ल्याची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:44 PM2019-01-05T21:44:59+5:302019-01-05T21:45:14+5:30
शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन सुंदर बुरूज आणि किल्ला पर्यटनामुळे आकर्षण ठरलेल्या बगड खिडकी येथील चौथ्या क्रमांकाच्या बुरूजाचे दगड अज्ञात व्यक्तींकडून काढून फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. इको-प्रो संस्थेकडून मागील ६१० दिवसांपासून दररोज सकाळी किल्ला स्वच्छता अभियान सुरू असताना ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन सुंदर बुरूज आणि किल्ला पर्यटनामुळे आकर्षण ठरलेल्या बगड खिडकी येथील चौथ्या क्रमांकाच्या बुरूजाचे दगड अज्ञात व्यक्तींकडून काढून फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. इको-प्रो संस्थेकडून मागील ६१० दिवसांपासून दररोज सकाळी किल्ला स्वच्छता अभियान सुरू असताना ही घटना घडली. अज्ञात आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी इको-प्रो संस्थेसह शहरातील नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन व संरक्षण करण्याऐवजी याप्रकारे नष्ट करण्याची वृत्ती चुकीची आहे. पुरातत्व विभाग, मनपा व जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे याच परिसरातून दर रविवारी 'किल्ला पर्यटन- हेरिटेज वॉक' ची सुरूवात करून अंचलेश्वर मंदिराजवळ समारोप केल्या जाते. या मार्गात किल्ला पर्यटन सोयीचे व्हावे, याकरिता जिल्हा प्रशासनाने एक पूल बांधला. गोंडकालिन किल्लावरून आजपर्यंत २३ वेळा रविवारी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले हे विशेष.
पिट्टीगुडा येथे सहा जणांना अटक
चंद्रपूर : पिट्टीगुडा येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकून पोलिसांनी सहा जणांना अटक केली. तर बल्लारपूर येथे सट्टापटीवर जुगार खेळणाऱ्या एका व्यक्ती अटक करण्यात आली. दोन्ही कारवाया शुक्रवारी केल्या. कलम १२ (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.