गुराख्यांकडून झाडांची नासधूस ; मारण्याची धमकी

By admin | Published: July 6, 2016 01:12 AM2016-07-06T01:12:20+5:302016-07-06T01:12:20+5:30

कृषी व पर्यावरण दिनाचे औचीत्य साधून शिक्षण प्रसारक मंडळाने कर्मवीर महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले.

Destruction of the trees from the herds; Threat to kill | गुराख्यांकडून झाडांची नासधूस ; मारण्याची धमकी

गुराख्यांकडून झाडांची नासधूस ; मारण्याची धमकी

Next

मूल : कृषी व पर्यावरण दिनाचे औचीत्य साधून शिक्षण प्रसारक मंडळाने कर्मवीर महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. मात्र वृक्षारोपण केलेल्या झाडांची बाहेरुन आलेल्या गुराखी नागरिकांनी नासधुस केली. याबाबत फिरायला गेलेल्या नागरिकांनी जाब विचारला असता, धारधार शस्त्राने माण्याची धमकी दिल्याचा प्रकार मूल येथे मंगळवारी घडला.
गुजरात राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या काही विशिष्ट समाजातील गुराखी जनावरांना घेवून कर्मवीर महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी मुक्काम ठोकला होता. याच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. जनावरांमुळे झाडांची मोठी झाली आणि पटांगणही खराब झाले. ही बाब सकाळी फिरायला जाणारे पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अविनाश गरपल्लीवार यांच्या लक्षात आली. त्यांनी जनावरांच्या मालकाला या ठिकाणी मुक्काम का ठोकला, असा प्रश्न करताच त्यांनी धारदार शस्त्र घेवून मारण्याची धमकी दिली. प्राचार्य गरपल्लीवार यांनी कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजाबराव वानखेडे आणि पोलिसांना घटनेची माहिती देवून घटनास्थळावर पाचारण केले. प्राचार्य डॉ. वानखेडे आणि पोलीस उपनिरीक्षक कुमरे यांनी लगेच घटनास्थळ गाठले. खराब केलेले पटांगण साफ करुन घेतले. यावेळी मूलचे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यावार, सामाजिक कार्यकर्ते उमेशसिंह झिरे, दिनेश गोयल, अश्विन पालीकर, छगन रामटेके उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Destruction of the trees from the herds; Threat to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.