कुसंगाने विनाशच साधेल

By admin | Published: January 12, 2016 12:57 AM2016-01-12T00:57:38+5:302016-01-12T00:57:38+5:30

सत्संगासाठी जर वेळच मिळत नसेल तर ठीक आहे. कदाचित त्याने काही अडचणी येणार नाहीत. पण कुसंग सोडणे क्रमप्राप्त आहे, ...

Destruction will follow | कुसंगाने विनाशच साधेल

कुसंगाने विनाशच साधेल

Next

स्वामी गोविंददेव महाराज : श्रीरामकथा प्रवचनमालेचे पाचवे आख्यान
चंद्रपूर : सत्संगासाठी जर वेळच मिळत नसेल तर ठीक आहे. कदाचित त्याने काही अडचणी येणार नाहीत. पण कुसंग सोडणे क्रमप्राप्त आहे, कारण त्याचा शेवट पतनातच होणार असल्याचा हितोपदेश आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सोमवारी केला.
येथील चित्रकुट धाममध्ये चाललेल्या श्रीरामकथा मालेत पाचवे पुष्प गुंफताना स्वामीजींनी कैकयी-मंथरा प्रसंगाचे निरुपण केले. कलंकाची ज्याला काळजी असते, तोच मुळात संवेदनशील असतो. त्याचेच अंत:करण शुध्द असते. राम वनवासाचा संदर्भ देत ते म्हणाले, त्यागाला कठीण परीक्षेतून जावे लागते. आज राष्ट्र-धर्म परंपरा वाचवायलासुध्दा त्यागाचीच गरज असल्याची गरज आचार्य स्वामीजींनी प्रतिपादित केली.
कथेतील पाचव्या दिवसाचे मुख्य यजमान लीलाराम उपाध्याय, राजमान सुधाकर चकनलवार, नरसिंगदास सारडा यांनी ग्रंथाची आरती केली. नागपूरहून आलेल्या अशोक करवा, गडचिरोलीचे माधोलाल शर्मा, डॉ. सुशील मुंधडा, कृषी अधिकारी देशमुख, डॉ. कुबेर कोतपल्लीवार, डॉ. विलास झुल्लरवार, कोल डिलर्स असोशिएशनचे सुरेश अग्रवाल, माहेश्वरी युवक मंडळाचे सुरेश राठी, अजय मेहता, महावीर मंत्री, रामकथा ज्ञानयज्ञ समितीच्यावतीने रोडमल गहलोत, विदर्भ माहेश्वरी सभेचे रामेश्वरलाल काबरा यांनी स्वामीजींचे विशेष आशीर्वचन घेतले.

मुलांनी वेधले लक्ष
गिता परिवाराच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या चंद्रपूरच्या शाळेतील २१ बालकांनी सोमवारी श्रीराम कथामालेच्या व्यासपीठावर गिता वाचन केले. त्यामुळे वातावरणात भक्ती-श्रध्देचा वेगळाच रंग भरला गेला. श्रीगणपती अथर्व शिर्ष आणि भगवत गितेतील १५ व्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. एक सूर, एक ताल असा मेळ जमल्याने वातावरण भारुन गेले. यावेळी मार्गदर्शक शिला उपाध्याय, माया उपाध्याय, सुनिता सोमानी, सरिता उपाध्याय यांनी मुलांचा उत्साह वाढविला.

Web Title: Destruction will follow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.