तेलगू बांधवांचा लढ्याचा निर्धार
By admin | Published: August 23, 2014 11:54 PM2014-08-23T23:54:33+5:302014-08-23T23:54:33+5:30
महाराष्ट्रात तेलगू बांधव शेकडो वर्षांपासून वास्तव्यास आहेत. खाणकाम, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत आहेत. समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबीत असूनसुद्धा शासन याकडे
चंद्रपूर: महाराष्ट्रात तेलगू बांधव शेकडो वर्षांपासून वास्तव्यास आहेत. खाणकाम, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत आहेत. समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबीत असूनसुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार तेलगू समाज बांधवांनी जिल्हास्तरिय मेळाव्यात केला. चंद्रपुरातील डीआरसी हेल्थ क्लबमध्ये मेळावा पार पडला.
अध्यक्षस्थानी सुभाष कासनगोट्टूवार होते. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रविण बडकेलवार, आयटकचे कामगार नेते के.एस.रेड्डी, बेलदार संघटनेचे प्रांतिय अध्यक्ष प्रा.चंद्रशेखर कोटेवार, आर.जे.स्वामी, समय्या पसुला, प्रेमकुमार चकीनाला, मधुकर आडेपवार, प्रभा चिलके, वसंत आकुलवार, डॉ.रमण, नगरसेवक सोमेश्वर आईटलवार आदि उपस्थित होते. मेळाव्यात तेलगू बांधवांच्या विविध मागण्यांविषयी चर्चा करून मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन लिनेश रामगिरवार यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आनंद अंगलवार यांनी, तर आभार पुल्लुरी राजेशम् यांनी मानले. मेळाव्याला बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)