महानगराला विकासाचे मॉडेल बनविण्याचा निर्धार

By admin | Published: March 7, 2017 12:42 AM2017-03-07T00:42:18+5:302017-03-07T00:42:18+5:30

विकासाला अभिप्रेत असलेल्या आर्थिक शिस्तीला प्राधान्य देऊन ज्या प्रयोजनार्थ आर्थिक निधीची तरतूद केली.

The determination to make a model of development in the metropolis | महानगराला विकासाचे मॉडेल बनविण्याचा निर्धार

महानगराला विकासाचे मॉडेल बनविण्याचा निर्धार

Next

हंसराज अहीर : विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम
चंद्रपूर : विकासाला अभिप्रेत असलेल्या आर्थिक शिस्तीला प्राधान्य देऊन ज्या प्रयोजनार्थ आर्थिक निधीची तरतूद केली. त्यासाठीच या निधीचा वापर करण्यावर भर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत अडीच वर्षात राज्यात शाश्वत विकास व पारदर्र्शी कारभार चालविला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी शहरी विकासाच्या अनेक महत्वपूर्ण योजना कार्यान्वित केल्या आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपच्या सत्ताकाळात झालेली कामे हा आजवरचा उच्चांक असून या दृष्य स्वरूपातील विकासाने भाजपाच्या विकासाभिमूख प्रतिमेला अधिक विश्वासार्हता लाभली असून या शहराला मॉडेल महानगर म्हणून विकसीत करण्याचा निर्धार असल्याचे ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
रविवारी चंद्रपूर महानगरातील विविध प्रभागात प्रस्तावित विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. रविवारी विविध ठिकाणी पार पडलेल्या सुमारे ८ करोड रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले.
या कार्याक्रमास आ. नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, भाजपा नेते विजय राऊत, उपमहापौर वसंत देशमुख, खुशाल बोंडे, राजेश मून, अनिल फुलझेले, माया उईके, रत्नमाला वायकर, तुषार सोम, राजें’्र अडपेवार, सुाष कासनगोट्टूवार, अंजली घोटेकर, रवी गुरुनुले, प्रमोद शास्त्रकार, मोहन चौधरी, प्रा. ज्योती भूते, राजू येले, यांचेसह भाजप महानगर पदाधिकारी आदींची विशेष उपस्थिती होती.
यावेळी डॉ. धांडे हॉस्पिटल तुकूम चंद्रपूर जवळील काँक्रीट रस्ता व स्टीट लाईट, सुमित्रानगर येथील वॉटर एटीएम मशिनचे लोकार्पण करण्यात आले.(नगर प्रतिनिधी)

Web Title: The determination to make a model of development in the metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.