संघटनात्मक बांधणीतून समाजाचा विकास करा
By admin | Published: January 13, 2015 10:57 PM2015-01-13T22:57:20+5:302015-01-13T22:57:20+5:30
प्रत्येक समाजात संघटना महत्त्वाची असून, संघटनेमुळेच समाजाचा विकास होतो. त्यामुळे तेली समाज बांधवांनी संघटनात्मक बांधणीवर भर देवून विस्तारलेला समाज एकत्र करावा
चंद्रपूर : प्रत्येक समाजात संघटना महत्त्वाची असून, संघटनेमुळेच समाजाचा विकास होतो. त्यामुळे तेली समाज बांधवांनी संघटनात्मक बांधणीवर भर देवून विस्तारलेला समाज एकत्र करावा आणि समाजाची प्रगती करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघाचे अध्यक्ष तथा वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी केली.
स्थानिक मातोश्री सांस्कृतिक सभागृहात तेली युवा मंडळ, चंद्रपूरच्यावतीने आयोजित उपवर-उपवधू परिचय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय रसायनमंत्री ना. हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, बबनराव फंड, प्राचार्य सूर्यकांत खनके, रावजी चवरे, शेखर वाढई, ओमप्रकाश मांडवकर, वासुदेव रागीट, मधुकर रागीट, सुमनताई उमाटे, नगरसेवक आकाश साखरकर आदी उपस्थित होते.
खा. तडस यांनी, तेली समाजाचा तिसऱ्या सुचित समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, आतापर्यंतच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, या मागणीला घेऊन लोकसभेचे आपण लक्ष वेधू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी ना. अहीर, ना. मुनगंटीवार, आ. वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी तेली समाजातील उपवर-उपवधू यांची माहिती असलेल्या ‘प्रेरणा’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. अहीर, ना. मुनगंटीवार, आ. चरण वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांचा तेली मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. खनके यांनी केले. संचालन कुमारी खनके तर आभार बी. डी. बिजवे यांनी मानले.
(स्थानिक प्रतिनिधी)