पकडीगुड्डम प्रकल्पाचा पर्यटनदृष्ट्या विकास साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:14+5:302021-07-16T04:20:14+5:30
कार्यकारी अभियंता यांना निवेदन ; कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी कोरपना : तालुक्यातील पकडीगुड्डम मध्यम प्रकल्पाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात यावा, ...
कार्यकारी अभियंता यांना निवेदन ; कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
कोरपना : तालुक्यातील पकडीगुड्डम मध्यम प्रकल्पाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात यावा, यासाठी धानोलीचे सरपंच विजय रणदिवे यांच्या नेतृत्वात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
पकडीगुड्डम मध्यम प्रकल्प हा कोरपना - जिवती तालुक्याच्या सीमेवर अतिशय निसर्गरम्य परिसरात आहे. त्यामुळे या ठिकाणी दूरवरून पर्यटक भेटी देतात. मात्र येथे पर्यटनदृष्ट्या कुठल्याच सोयी सुविधा उपलब्ध नाही. परिणामी पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या अनुषंगाने येथील पर्यटन विकास साधण्यात यावा, तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, कालव्यांची दुरुस्ती करण्यात यावी, प्रकल्पाचे शाखा अभियंता कार्यालय कोरपना येथे सनियंत्रणासाठी हलविण्यात यावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सचिव ओम पवार, नारायण राठोड व नागरिक उपस्थित होते.