कलेतून अध्यापनाची दृष्टी विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:10 AM2017-12-21T00:10:42+5:302017-12-21T00:11:13+5:30

विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा समृद्ध करण्यासाठी कलागुणांचाही उत्तमरित्या वापर करता येऊ शकते.

Develop a vision of teaching in art | कलेतून अध्यापनाची दृष्टी विकसित करा

कलेतून अध्यापनाची दृष्टी विकसित करा

Next
ठळक मुद्देपी. आर. पाटील : जिल्हास्तरीय कला विषयक कृतिसत्र

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा समृद्ध करण्यासाठी कलागुणांचाही उत्तमरित्या वापर करता येऊ शकते. त्यासाठी शिक्षकांनी अध्यापनातून ही दृष्टी विकसीत करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाच्या प्संयुक्त विद्यमाने स्थानिक एफईएस गर्ल्स हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या एक दिवसीय जिल्हास्तरीय कला विषयाचे कला अभ्यासक्रम व मुल्यमापन कार्यपद्धती कृतिसत्रात ते बोलत होते. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांनी कृतिसत्राचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका हंसा गिरडकर, विषयतज्ज्ञ मोहन भोजापूरे, विभागीय सहकार्यवाहक सुदर्शन बारापात्रे, प्रशांत नवघरे, भोयर, माजी अध्यक्ष एम. एम. अली, पी. व्ही. पाटील, किरण पराते, सचिव कार्तिक नंदूरकर आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात पी. आर. पाटील म्हणाले, शिक्षकांना अध्यापनात येणाºया अडचणीवर मात करुन नवनव्या कला आत्मसात केले पाहिजे. संघटीत होऊन समस्यांचे निराकरण सहजपणे करता येते. कला विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेतली पाहिजे. विषयतज्ज्ञ व प्रमुख वक्ते मोहन भोजापूरे यांनी कला वियषाच्या विविध पैलुंवर मार्गदर्शन केले. कला विषयातील सर्व बारकाव्यानिशी विषयाचे सादरीकरण करून शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी या संवाद उत्साहाने सहभाग घेतला होता. भद्रावती येथील ग्रामोद्योग संघाचे गाडेकर व नरोत्तमदास यांनी माती कला आणि संगीत शिक्षक नासीरकर यांनी संगीत विषयाचे प्रात्याक्षिक सादर करुन शिक्षकांच्या ज्ञानात भर घातली. मुख्याध्यापिका हंसा गिरडकर यांनी कला विषयक अध्यापनातील उपयोजनेचे महत्त्व प्रतिपादीत केले. विभागीय सहकार्यवाह सुदर्शन बारापात्रे व सल्लागार प्रशांत नवघरे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन संजय अंड्रस्कर व ज्योती बावणे यांनी केले.

Web Title: Develop a vision of teaching in art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.