तपोभूमीचा विकास गुरुदेवाच्या शक्तीनेच

By admin | Published: January 13, 2017 12:30 AM2017-01-13T00:30:55+5:302017-01-13T00:30:55+5:30

राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदेडा (गुंफा) तपोभूमी मागील अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित होती.

The development of ascetic is only with the power of Gurudeva | तपोभूमीचा विकास गुरुदेवाच्या शक्तीनेच

तपोभूमीचा विकास गुरुदेवाच्या शक्तीनेच

Next

मितेश भांगडिया : तपोभूमीत उसळला गुरुदेव भक्तांचा जनसागर
चिमूर : राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदेडा (गुंफा) तपोभूमी मागील अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित होती. मात्र मागील वर्षापासून या भूमीच्या विकास कामांना मिळालेली गती गुरुदेव भक्तांच्या शक्तीनेच. तपोभूमीत होणाऱ्या विकासकामांचे माध्यम हे आमदार कीर्तीकुमार भांगडिया असले तरी विकास हा गुरुदेव भक्तांच्या शक्तीनेच होत असल्याचे मत आमदार मितेश भांगडिया यांनी गोंदेडा गुंफा येथे आयोजित यात्रा महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.
८ जानेवारीपासून सुरू झालेल्या गोदेडा (गुंफा) यात्रा महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार कीर्तीकुमार भांगडिया तर विशेष अतिथी म्हणून प्रशांतपंत वाघ, अमरावतीचे लक्ष्मणदादा काळे महाराज, सोहन राऊत, शिवानंद गादेवार, जि.प. सदस्या गीता लिंगायत, वर्षा लोणारकर, गुंफा समितीच्या अध्यक्षा अरुणा अडसोडे, सरपंच राजेंद्र धारणे, दिनेश चिटनूरवार, यावली येथील जितेंद्र होले आदी उपस्थित होते.
आमदार कीर्तीकुमार भांगडिया म्हणाले की, आपण गुरुदेवाचे विचार किती घरात पोहचविले हे महत्त्वाचे आहे. गुरुदेव भक्तांसाठी १२ महिने दिवाळी असायला पाहिजे. तेव्हा प्रत्येकाने त्यांचे विचार घराघरात पोहचवण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, अनेक गुरुदेव भक्तांनी मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात अनेक उपक्रम राबविण्यात आले. यात्रा अहवाल वाचन प्रा. भास्कर वाढई यांनी केले. संचालन प्रकाश सोनुले तर आभार एम.एस. भोयर यांनी मानले. गोपालकाल्या वाटपानंतर सांगता करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

अन् आमदार बसतात भवनात
युवा शक्तीच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करणारे आमदार कीर्तीकुमार भांगडिया मागील वर्षीपासून स्वत: विचार मंचावर न बसला गुरुदेव भक्तात बसतात. मंचावर न जाता प्रेक्षक गॅलरीतूनच आपले विचार व्यक्त करतात. या वर्षी तर आयोजकांना विनंती करीत निमंत्रण पत्रिकेवर कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचे नाव न टाकण्याची विनंती करीत ज्यांना गुरुदेवाची आवड आहे ते स्वत:च येतील असेही आवाहन केले.

Web Title: The development of ascetic is only with the power of Gurudeva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.