अडीच कोटी रुपयातून स्मशानभूमींचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:47+5:302021-02-07T04:26:47+5:30

नागभीड : नागभीड येथील स्मशानभूमीच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधी योजनेंतर्गत २ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून ...

Development of cemeteries at a cost of Rs. 2.5 crore | अडीच कोटी रुपयातून स्मशानभूमींचा विकास

अडीच कोटी रुपयातून स्मशानभूमींचा विकास

Next

नागभीड : नागभीड येथील स्मशानभूमीच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधी योजनेंतर्गत २ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून नागभीड नगर परिषदेतील ५ स्मशानभूमीतील विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.

नागभीड नगर परिषद ९ ग्रामपंचायती मिळून बनविण्यात आली आहे. याशिवाय विविध गावेही नगर परिषदेत समाविष्ट आहेत. या नगर परिषदेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक गावांना स्वतःची स्वतंत्र स्मशानभूमी आहे. सद्यस्थितीत नागभीड, बाम्हणी, बोथली, नवखळा व चिखलपरसोडी या ठिकाणच्या स्मशानभूमीतील विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. या विकास कामांतर्गत स्मशानभूमीत सभागृह, दहनशेड, शौचालय, बाथरूम, बोअरवेल, सिमेंट रोड व प्रवेशद्वार ही कामे करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी ही कामे सुरूही करण्यात आली असून पूर्णत्वास येत आहेत.

कोट

या निधीतून या पाचही स्मशानभूमीतील कामे होणार आहेतच; पण भविष्यकाळात बसायचे मेज, हायमॅक्स लाइट आणि वृक्षारोपणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

- सचिन आकूलवार, बांधकाम सभापती, न.प. नागभीड.

Web Title: Development of cemeteries at a cost of Rs. 2.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.