टीडीआर प्रणालीतून चंद्रपूर महानगराचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:57 AM2017-08-30T00:57:18+5:302017-08-30T01:00:57+5:30

Development of Chandrapur metropolis from TDR system | टीडीआर प्रणालीतून चंद्रपूर महानगराचा विकास

टीडीआर प्रणालीतून चंद्रपूर महानगराचा विकास

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर स्मार्ट शहर करण्यासाठी नवा विकास आराखडा तयार करा


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये घरे बांधण्यासाठी जागा कमी आहे. मात्र कमी जागेमध्ये सुंदर शहराची रचना करण्यासाठी जनतेला नवीन घरकूल कायदा व धोरणांमार्फत सुविधा व संधी उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेला आवडेल आणि शहराच्या सामुदायिक विकासात आपले दायित्व द्यावे वाटेल, अशा व्यवहारिक टीडीआर (टॉन्सफरेबल डेव्हलपमेंट राईट) प्रणालीचा विकास करण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
चंद्रपूर येथे ‘क्रेडाई’ (कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोशियशन आॅफ इंडिया) या विकासकांच्या संघटनेतर्फे चंद्रपूर शहर विकास आराखडा आणि हस्तांतरण विकास हक्क (डेव्हलपमेंट प्लॅन आॅफ चंद्रपूर सिटी अ‍ॅन्ड ट्रॉन्सफरेबल डेव्हलपमेन्ट राईट) या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, मनपा आयुक्त संजय काकडे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, क्रेडाईचे अध्यक्ष सुधीर ठाकरे, सचिव संतोष कोलेट्टीवार आदी उपस्थित होते.
सध्या चंद्रपूर महानगर पालिका ‘ड’ वर्गात मोडते. पालिकेच्या उत्पनाच्या स्त्रोतांना मर्यादा आहे. त्यामुळे विकास कामे करताना अडचणी असतात. अशाच अडचणी या ठिकाणच्या गृहनिर्माण क्षेत्रातही आहे. २० वर्षा पूर्वीच्या विकास आराखड्याला बदलवण्याची वेळ आली आहे. नवीन सरकार आल्यानंतर विकास आराखडयात आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागांचे महत्व वाढले असून या ठिकाणी विकास करताना टीडीआर नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरात १५६ आरक्षित जागा आहेत. या सर्वाना टीडीआर कायदा समजून सांगावा लागेल. मालकांचा महानगरपालिकेचा आणि या शहराचा यामध्ये कसा फायदा आहे, हे पटवून द्यावे लागेल. वाढलेला एफएसआय आणि बदलेले टीडीआर धोरण यामुळे नव्या विकासाच्या वाटा कशा पध्दतीने उपलब्ध झाल्यात, हे सामान्यांच्या लक्षात आणून देण्याचे पालकमंत्र्यांनी सूचित केले.
केवळ ८.६२ टक्के निवासी जागा
कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांनी विकास आराखडा व टीडीआर या संदर्भातील सादरीकरण केले. चंद्रपूर शहरामध्ये केवळ ८.६२ टक्के निवासी जागा शिल्लक आहे. त्यामुळे उपलब्ध असणाºया जागांमध्ये आता उंच इमारतींशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Development of Chandrapur metropolis from TDR system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.