निधीअभावी तळोधी बा.चा विकास खुंटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:15+5:302021-08-13T04:32:15+5:30
तळोधी बाः अप्पर तळोधी बा. ही सर्वात मोठी १७ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे. मात्र तळोधी बा. ...
तळोधी बाः अप्पर तळोधी बा. ही सर्वात मोठी १७ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे. मात्र तळोधी बा. शहराचा विकास निधीअभावी खुंटला असल्याने तळोधी बा.ला नगरपंचायत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तळोधी बा.येथे अप्पर तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, वनपरिक्षेत्र कार्यालय, कृषी कार्यालय, स्टेट बँक, ॲक्सिस बँक, कोकण बँक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक, धनश्री पंतस्स्था, स्वामी पंतसंस्था, श्रीलक्ष्मी पतसंस्था, कोहीनूर पंतसंस्था, साईकृपा पतसंस्था, समृद्ध महाराष्ट्र पतसस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, जवाहर नवोदय विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, लोकविद्यालय, यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय, गोंविदप्रभू महाविद्यालय व अनेक कॉन्व्हेंट व इतर व्यवसाय आहेत. या शहराची लोकसंख्या १८ हजाराच्या वर आहे. तळोधी बा. मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या गावाचा सभोवतालच्या ४२ गावांशी संपर्क येत असल्याने नेहमी लोकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. विकास करण्यासाठी नगर पंचायत होणे आवश्यक आहे.
कोट
तळोधी बा. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून निधीअभावी शहराचा विकास खुंटला आहे. गावाचा विकास करण्यासाठी तळोधी बा.ला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा.
- डोनूजी पाकमोडे,
ग्रामपंचायत सदस्य तळोधी बा.
कोट
तळोधी बा. शहरातील अंतर्गत रस्ते खराब झाले असून त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. गावाचा विकास करण्यासाठी नगरपंचायतीची गरज आहे.
- नितीन कटारे
तळोधी-गोंविदपूर जिल्हा परिषद प्रमुख समन्वय