राष्ट्रसंतांच्या विचारातून गावांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:38 AM2020-12-30T04:38:37+5:302020-12-30T04:38:37+5:30
चिखलीत प्रबोधन सप्ताह : स्पधेर्तील विजेत्यांना पुरस्कार मूल : चिखली येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ यांचेवतीने ...
चिखलीत प्रबोधन सप्ताह : स्पधेर्तील विजेत्यांना पुरस्कार
मूल : चिखली येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ यांचेवतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित्याने आयोजीत सात दिवसीय सप्ताहाचे समारोप व बक्षीस वितरण सोहळा पार पडला अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष संध्या गुरनुले तर प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालयाचे उपसचिव किरण गावतुरे, माजी नगरसेवक प्रभाकर भोयर, माजी सरपंच मुकेश गेडाम, माजी सरपंच ऊर्मिला कडस्कर, उश्राळाचे सरपंच बंडू नर्मलवार, ऊमाजी मंडलवार, ऋषी लाटरवार महाराज, डोपाजी कडस्कर, माजी सरपंच विश्वनाथ काकडे, सुनील कुंभरे, देवराव मुंघाते उपस्थित होते.
जिल्हा परिषदच्या अध्यक्ष संध्या गुरनुले म्हणाल्या, राष्ट्रसंतांनी आपल्या संपूर्ण जीवनकाळात ग्रामसेवेचे तत्व अंगीकारून तळागाळातील लोकांपर्यंत देशप्रेम, धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गाव हा विश्वाचा नकाशा असे म्हणत गावाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी ग्रामगीता रचली. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ग्रामनाथाच्या स्वावलंबी जीवनासाठी अनेक यशस्वी मार्ग ग्रामगीतेच्या माध्यमातून अधोरेखित केले. आयुष्याच्या शेवटातही राष्ट्रसंतांनी राष्ट्रधर्म, ग्रामजागृतीसाठी निरंतर दौरा केला. त्यांचे ग्रामोन्नतीसाठीचे कार्य आजही गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून अखंडपणे चालू आहे. राष्ट्रसंतांनी गुरूदेव सेवा मंडळाच्या रुपात लावलेली ही ज्योत सदैव तेवत आहे. राष्ट्रसंतांचे हेचं कार्य आज देशाला आणि पर्यायी तरुणपिढीला पथदर्शक ठरत आहेत. म्हणून राष्ट्रीय एकात्मतेबरोबर युवकांच्या उत्थानासाठी राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला गरज असल्याचेही अध्यक्ष गुरनुले यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.