देवमाणूसच्या ठसकेबाज आजीचे बल्लारपूरात तीन वर्षांपूर्वी झाले होते आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:04+5:302021-06-02T04:22:04+5:30
बल्लारपूर : देवमाणूस या मालिकेतील बेधडक शब्दांची तोफ आपल्या खास शैलीत तोंडातून धडधडणारी ठसकेबाज आजी तिच्या संवाद फेकीमुळे प्रेक्षकांना ...
बल्लारपूर : देवमाणूस या मालिकेतील बेधडक शब्दांची तोफ आपल्या खास शैलीत तोंडातून धडधडणारी ठसकेबाज आजी तिच्या संवाद फेकीमुळे प्रेक्षकांना भलतीच भावली आहे. ही तडफदार भूमिका रुक्मिणी सुतार यांनी निभावली असून, एवढ्या मोठ्या लांबीची आणि एवढी लक्षवेधी ही त्यांची पहिलीच भूमिका आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या लहान भूमिका करीत आहेत. फार लहान भूमिकांमुळे त्यात प्रसिद्धीपासून दूर होत्या. दरम्यान, ४ एप्रिल २०१९ ला त्या बल्लारपूरला (अमीर खान बल्लारपूरला आला तो दिवस) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. येथील राहिकवार लघुचित्रपट संस्थेकडून आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्काराने शिक्षणमहर्षी पांडुरंग आंबटकर, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, राहिकवार लघुचित्रपट संस्थेचे संचालक गणेश राहिकवार यांनी त्यांचा गौरव केला. आमच्यासारख्या लहान कलावंतांची कुणी दखल घेत नाही. त्यात तेथे जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, ही माझ्याकरिता खूप मोठी गोष्ट आहे, असे सुतार यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले. देवमाणूसद्वारे त्यांना आता मोठे नाव मिळाले आहे.
===Photopath===
010621\img-20210601-wa0012.jpg
===Caption===
देवमाणुसच्या ठसकेबाज आजीचे बल्लारपूरात तीन वर्षांपूर्वी झाले होते आगमन