कार्तिक स्नानासाठी वढा संगमावर भक्तीचा पूर

By admin | Published: November 26, 2015 12:49 AM2015-11-26T00:49:07+5:302015-11-26T00:49:07+5:30

येथून जवळच असलेल्या लहान पंढरपूर नावाने प्रसिद्ध वढा येथील वर्धा-पैनगंगा नदीचा संगम व उत्तर वाहणीवर कार्तिक पोर्णिमानिमित्त हजारो भाविकांनी स्नान केले.

Devotee flood to Kartik bathing on the Sangma | कार्तिक स्नानासाठी वढा संगमावर भक्तीचा पूर

कार्तिक स्नानासाठी वढा संगमावर भक्तीचा पूर

Next

विविध ठिकाणचे भाविक दाखल : विठ्ठल-रूख्माईच्या दर्शनासाठी सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी
चंद्रपूर/घुग्घुस : येथून जवळच असलेल्या लहान पंढरपूर नावाने प्रसिद्ध वढा येथील वर्धा-पैनगंगा नदीचा संगम व उत्तर वाहणीवर कार्तिक पोर्णिमानिमित्त हजारो भाविकांनी स्नान केले. भाविकांनी आंघोळीसाठी एकच गर्दी करून विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे येथे बुधवारी दिवसभर भक्तांची मांदियाळी दिसून आली.
दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेसाठी बुधावरी पहाटे पासूनच विविध जिल्ह्यातील व या पंचक्रोशीतील हजारो महिला, पुरुष, आबालवृद्धांनी वर्धा-पैनगंगेचा संगम व उत्तर वाहिनीवर गर्दी केली.
विदर्भातील लहान पंढरपूर म्हणून सुपरिचित वढा येथील दोन्ही नद्या संगम व तीरावर प्राचीन विठ्ठल रुखमाईचे मंदिर आहे. या पंचक्रोशितील भाविक मोठ्या भावनेने पहाटेपासून स्रानासाठी येऊन विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिर परिसरात अनेक देवीदेवताच्या मूर्ती असून त्यात विशेष शिवपुत्र कार्तिकेयची मूर्ती आहे. दरवर्षी पायदळ वारी करणाऱ्या एका महिलेने सदर मंदिरातील विठ्ठल रुक्माईची मूर्ती बऱ्याच वर्षांआधी पंढरपूर वरुन आणली आणि तिच मूर्ती आजही मंदिरात उभी आहे.
विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात रात्री उशिरा पर्यंत दर्शन घेणे सुरूच होते. घुग्घुसच्या प्रियदर्शनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील भारत स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी व रोटरी रोअर क्लबच्या संयुक्त विद्यमाने भाविकांना नास्ता, पाणी पाऊच वितरण करून यात्रा परिसर स्वच्छतेसाठी हातभार लावला. वढा ग्रामपंचायतीने सुध्दा यात्रेचे नियोजन करून भाविकांना आवश्यक सोय उपलब्ध करून दिली. (लोकमत चमू)

यात्रेसाठी धावल्या विशेष बसगाड्या
श्री तिर्थक्षेत्र वढा येथे कार्तिक पोर्णिमेनिमीत्त्य भरणाऱ्या यात्रेसाठी चंद्रपूर आगाराने विशेष बसगाड्या सोडल्या. भाविकांना प्रवास दरम्यान गैरसोय होऊ नये वढा येथे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले होते. दिवसभरात २० ज्यादा बसेस यात्रेसाठी सोडण्यात आल्या. त्यामुळे भाविकांची गैरसोय दूर झाली.

पार्किगच्या नावावर लूट
स्वत:च्या वाहनाने यात्रेत येणाऱ्या भाविकांना वाहन सुरक्षित ठेवाता यावे, यासाठी वढा येथे पार्किंग स्टॅन्ड उभारण्यात आले होते. मात्र या स्टॅन्डवर दुचाकी वाहनांना पार्किंगच्या नावावर चक्क ३० रूपये आकारण्यात आले. त्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारकांनी स्टॅन्ड चालकाशी हुज्जतही घातली. मात्र प्रत्येक दुचाकीस्वाराकडून ३० रूपयेच आकारण्यात आल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
घुग्घुसचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात यात्रास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांची ठिकठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. वाहतूक व्यवस्था कोलमडू नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस भाविकांना वेळोवेळी सुचना देताना दिसून आले.

Web Title: Devotee flood to Kartik bathing on the Sangma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.