बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे धम्मदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:15 AM2020-12-28T04:15:32+5:302020-12-28T04:15:32+5:30
चंद्रपूर : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या धम्म चळवळीला गतीमान करण्यासाठी स्थानिक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन ...
चंद्रपूर : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या धम्म चळवळीला गतीमान करण्यासाठी स्थानिक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे आयोजित कार्यक्रमात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दहा हजार रुपयांचे तसेच बौद्ध धम्माचे कार्य करीत असलेले एस. एन. बौद्ध उर्फ शंकरराव नगराळे यांनी एक लाख रुपयांचे धम्मदान राजरत्न आंबेडकर यांना दिले. यावेळी यावेळी शंकरराव नगराळे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले दोन आर्य सत्य’ या पुस्तकांचे विमोचन राजरत्न आंबोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष राजकुमार जवादे, सल्लागार सुभाष मेश्राम, सहसचिव मुन्ना आवळे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय सिडाम, जिल्हाध्यक्ष रविंद्र येसांबरे, सचिव नितीन गेडाम, जिल्हा सल्लागार नवनाथ देरकर आदी उपस्थित होते.