भारतीय बौद्धमहासभेतर्फे धम्मदीक्षा कार्यक्रम
By admin | Published: July 11, 2016 01:02 AM2016-07-11T01:02:12+5:302016-07-11T01:02:12+5:30
भारतीय बौद्ध महासभा तालुका सिंदेवाही तर्फे शोभीत मैत्री विहार येथे तालुका संघटक श्रावण नागदेवते ....
सिंदेवाही : भारतीय बौद्ध महासभा तालुका सिंदेवाही तर्फे शोभीत मैत्री विहार येथे तालुका संघटक श्रावण नागदेवते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष सेवचंद्र नागदेवते व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत धम्मदिक्षा कार्यक्रम घेण्यात आला. सेवचंद्र यांनी युवक-युवतींना दीक्षेची याचना केल्यानंतर विधीप्रमाणे धम्मदिक्षा दिली.
धम्मदिक्षेचे महत्त्व सांगताना धम्मात भिक्खू होण्यासाठी विधी आहे. बौद्ध धर्मात संघदिक्षा आहे. पूर्वी उपासकासाठी धम्मदिक्षा नव्हती. या कारणाने उपासक बौद्ध धर्मातून जैन धर्मात, दुसऱ्या धर्मात जात असायचा होते. तेव्हा उपासकासाठी धम्मदिक्षेच्या विधीचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाबोधी सोसायटीचे सहसचिव वली सिन्हा यांनी दिली. बौद्ध होण्यासाठी दिक्षा घेऊन धम्माप्रमाणे आचरण करावे. संघटक रमेश डोंगरे, दादाजी नागदेवते, शांताबाई पाझारे, गुंजेवाही सरपंचा सिंधुताई बारसागडे, यांनी उपस्थितांना मार्गादर्शन केले. प्रास्ताविक देवेंद्र शामकुळे संचालन मिनाक्षी बारसागडे तर आभार सुलोचना रामटेके यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)