पोंभुर्णा तालुक्यातील धानपिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:30 PM2017-09-24T23:30:59+5:302017-09-24T23:31:49+5:30
तालुक्यामध्ये तब्बल एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने आणि सततच्या तीव्र उन्हामुळे धान पीक करपायला सुरूवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्र्णा : तालुक्यामध्ये तब्बल एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने आणि सततच्या तीव्र उन्हामुळे धान पीक करपायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्याने शेतकºयांची धानपीके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरमधील उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शेतकºयांचे बहरलेले पीक पुन्हा संकटात सापडले आहे़
यावर्षी धानपिकांच्या पºहे टाकवणीनंतर पाऊस उशीरा पडल्याने धानपिकांची रोवणी उशीरा करण्यात आली. त्यामुळे पीक ज्या स्थितीमध्ये पाहिजे, त्या स्थितीत नाही़ तरीही शेतकºयांनी हिंमत न सोडता शेतीची कामे सुरू ठेवली आहे.
परंतु तब्बल एक महिन्यांपासून कडक ऊन तापत असल्याने याचा परिणाम मध्यम प्रतिच्या धान पिकांवर जास्त होत असून सदर धानपिक निसावण्याच्या उंबरठ्यावर आले आहे़ त्यातच उन्हाच्या दाहकतेने काही प्रमाणात तग धरून असलेले धानपिक पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.
किटकनाशक औषधांचा पुरवठा करावा
स्थानिक परिसरातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे व उत्पादीत खर्चानुसार भाव मिळत नसल्याने हतबल होवून कर्जबाजारी झाला आहे़ खासगी कृषी केंद्रातून महागडी औषधी घेऊन फ वारणी करणे त्यांच्यासाठी परवडणारे नाही. त्यामुळे अनेक गरीब शेतकरी औषधी घेऊन फ वारणी करू शकत नाही.पर्यायाने त्यांना पाहिजे तसे उत्पादन घेता येत नाही. त्यामुळे शेतकºयांना स्थानिक स्तरावरुन मोफ त औषधी देण्याची मागणी पोंभुर्णा तालुक्यातील शेतकºयांकडून करण्यात येऊ लागली आहे.