धानोरकर दाम्पत्यांनी दिला १ कोटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:56+5:30
मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चंद्रपूर व यवतमाळच्या जनतेसाठी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य धावून आले आहे. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख असे एकूण एक कोटीचा निधी देऊन साहित्य खरेदी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस शोधण्यात यश आले नसल्याचे दिसून येत आहे. या विषाणूपासून बचावासाठी स्वत:च खबरदारी घेण्याचे आवाहन शासन करीत आहे. परंतु मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चंद्रपूर व यवतमाळच्या जनतेसाठी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य धावून आले आहे. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख असे एकूण एक कोटीचा निधी देऊन साहित्य खरेदी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहे.
खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून कोरोना विषाणूविरुद्ध प्रखर लढयासाठी व प्रतिबंधक उपाययोजनांसाठी साहित्य खरेदी कारण्याकररिता ५० लक्ष निधी मंजूर केला आहे. तसेच आमदार प्रतिभा धानोरकर यांनीदेखील आपल्या आमदार निधीतून ५० लक्ष इतका निधी कोरोना प्रतिबंधक उपायोजना कार्याकरिता साहित्य खरेदी करण्याकरिता मंजूर केला आहे. याबाबतचे पत्र खासदार व आमदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. खा. बाळू धानोरकर यांच्या निधीपैकी २० लाख यवतमाळ जिल्ह्याला दिले.