ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेचे धिंडवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:10+5:302021-09-13T04:26:10+5:30
कूचना : माजरी-पाटाळा-कुचना जिल्हा परिषद परिसरातील आरसा म्हणून ओळखल्या जाणारा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले ...
कूचना : माजरी-पाटाळा-कुचना जिल्हा परिषद परिसरातील आरसा म्हणून ओळखल्या जाणारा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले असून त्यात ट्रॅक्टर, मेटॅडोरसारखी वाहने फसून रस्ता आणखी खराब झाला आहे. दुचाकीस्वारांना जीव वाचवत प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना जिल्हा परिषद प्रशासनाच्या बांधकाम अभियंत्यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असून माहिती देऊनही कधी ग्रामीण भागात फिरत नसल्याची खंत स्थनिकांकडून व्यक्त केली जात आहे. भद्रावती-वणी-वरोरा समान अंतर पडत असल्याने रोज वेकोली कर्मचारी नोकरीसाठी तसेच व्यावसायिक दृष्टीने हा रस्ता सोयीचा येथूनच मार्गक्रमण करतात. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याची मागणी पळसगाव येथील महेश निब्रड, स्वप्निल वासकर व स्वप्निल जोगी यांनी केली आहे.
120921\img_20210912_102601.jpg
ट्रॅक्टर फसल्याने वाहतूक खोळंम्बली ग्रामीण भागाचे वास्तव जी.प. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष