हिंदू सणांच्या बंदीविरोधात ढोल बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:33+5:302021-08-29T04:27:33+5:30

चंद्रपूर : राज्य सरकार हिंदू सण-उत्सवांवर बंदी घालत असून, महाराष्ट्रातील हिंदू बांधवांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करीत चंद्रपूर जिल्ह्यातील ...

Dhol Bajao Andolan against the ban on Hindu festivals | हिंदू सणांच्या बंदीविरोधात ढोल बजाओ आंदोलन

हिंदू सणांच्या बंदीविरोधात ढोल बजाओ आंदोलन

Next

चंद्रपूर : राज्य सरकार हिंदू सण-उत्सवांवर बंदी घालत असून, महाराष्ट्रातील हिंदू बांधवांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करीत चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी छोट्या गोविंदाच्या हस्ते दहीहंडी फोडत सरकारविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. हिंदूंच्या सण-उत्सवांवरील बंदी सरकारने उठवून महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरा जोपासावी, दहीहंडी व गणेशोत्सवास परवानगी द्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

कोरोनाचे कारण समोर करून हिंदूंना आपली संस्कृती व परंपरा जोपासण्यासाठी मज्जाव केला जात आहे. दुसरीकडे राजकीय मेळावे, भाजपची यात्रा निघू शकते. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा होऊ शकतो. तर मग हिंदूंच्या दहीहंडी व गणेश उत्सवावरच बंदी का, असा प्रश्नही उपस्थित केला. दरम्यान, हिंदूंच्या सण-उत्सवांवर लावलेली बंदी उठवावी यासाठी सरकारच्या विरोधात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी व जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या वेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव किशोर माडगूलवार, मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, तालुकाध्यक्ष विवेक धोटे, मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, श्रीकांत नुने, मनोज तांबेकर, पीयूष धुपे, राहुल यदुवंशी, कृष्णा गुप्ता, प्रवीण शेवते, करण नायर, कोमल ठाकरे, सुरज भामरे, अक्षय चौधरी, राकेश बोरीकर, नितेश जुमडे, नितीन पेंदाम, जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्षा वाणी सदालावार, विभाग अध्यक्षा वर्षा भोमले, तुषार येरमे, शैलेश सदलावार, सचिन गुप्ता, राजेंद्र वर्मा, सचिन चिंचुलकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Dhol Bajao Andolan against the ban on Hindu festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.