त्या शिक्षकाच्या गीतांची सोशल मीडियावर धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:00 AM2021-09-02T05:00:10+5:302021-09-02T05:00:10+5:30
गोंडपिपरी : जिल्हा परिषद शाळेतील एका ध्येयवेड्या शिक्षकाने आपली गिते संगीतबद्ध करीत अल्बमच्या रूपात रसिकांच्या भेटीला आणली आहे. ...
गोंडपिपरी : जिल्हा परिषद शाळेतील एका ध्येयवेड्या शिक्षकाने आपली गिते संगीतबद्ध करीत अल्बमच्या रूपात रसिकांच्या भेटीला आणली आहे. या अल्बममधील अनेक गीते आता रसिकांना भुरळ घालत आहे. विशेष म्हणजे, कोरोनात आई-वडील गमावलेल्या बालकांच्या वेदना त्यांनी गीतातून स्वरबद्ध केल्या आहे. अल्पावधीतच ते रसिकांच्या मनावर अधिराज्य करीत आहे. मुरलीधर सरकार असे या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव आहे.
कोरोना काळात सर्वत्र टाळेबंदी होती. नागरिकांच्या मनात कोरोनाची दहशत होती. अनेक रोजगार बुडाले. व्यवसाय ठप्प पडले. हीच परिस्थिती कलावंतांवरही आली. अनेक कलावंतांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे या कलावंतांच्या हाताला काम, तसेच त्यांच्या कलागुणांना डिजिटल मंच मिळवून देण्यासह देशाच्या कानाकोपऱ्यांतील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी "प्रेमाचे गुंतले धागे" हा अल्बम तयार केला. लोकार्पण होताच तो एका दिवशी ११ हजार रसिकांनी बघितला. विशेष म्हणजे हा व्हिडिओ अल्बम असून, यातील कलावंत, संगीतकार, निर्माता सर्वच स्थानिक आहेत. चंद्रपूर, जुनोना, लोहारा आणि परिसरातच चित्रीकरण करण्यात आले. ‘कुठे शोधू मायबापाला’ हे गीत कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलांच्या वेदना मांडणारे आहेत, तर ‘माझी रिंगटोन, प्रेम करतो मामाच्या पोरीवर’ आदी गीते अस्सल मनोरंजन करणारे आहेत.
010921\1343-img-20210901-wa0005.jpg
जिल्हा परिषद शिक्षक मुरलीधर सरकार यांचा फोटो