धोपटाळा, चिंचोली प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा लवकरच निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:46+5:302021-03-04T04:53:46+5:30
यावेळी वेकोलिचे मुख्य प्रबंध निदेशक मनोजकुमार, कार्मिक निदेशक संजय कुमार व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोळसा खरेदीदार कंपनीकडून करारनामा ...
यावेळी वेकोलिचे मुख्य प्रबंध निदेशक मनोजकुमार, कार्मिक निदेशक संजय कुमार व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोळसा खरेदीदार कंपनीकडून करारनामा करावा. तांत्रिकदृष्ट्या एकत्रीकरण करून प्रकल्पग्रस्तांना तातडीने धनादेश वितरण करण्याची सूचना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी मुख्य प्रबंध निदेशक मनोजकुमार यांच्याकडे केली. चिंचोली रिकास्ट प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. पौनी २ प्रकल्पातील प्रलंबित १७ प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांकडे लक्ष वेधले. न्यायप्रविष्ट कोणताही स्थगनादेश, मनाई हुकूम, वेकोलि पार्टी नसलेल्या प्रकरणातील नोकऱ्या खुल्या करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत भाजपाचे जिल्हा महामंत्री राजेश मून, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, अॅड. प्रशांत घरोटे, पुरूषोत्तम लांडे, शरद चाफले, प्रफुल्ल देवगडे, सागर काटवले, श्रीनिवास दुडम, कुडे व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.