कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्चदाब सर्वांत पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:17+5:302021-04-29T04:21:17+5:30
कोरोना विषाणू मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरात प्रवेश केल्यावर वेगाने संक्रमण होण्याची शक्यता असते. निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यावर हा विषाणू अतिशय ...
कोरोना विषाणू मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरात प्रवेश केल्यावर वेगाने संक्रमण होण्याची शक्यता असते. निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यावर हा विषाणू अतिशय संथगतीने संक्रमित होतो. त्यामुळे व्यक्ती बरा होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, मधुमेह, उच्चदाब असलेल्या व्यक्तीच्या शरीरात या विषाणूने प्रवेश केल्यास श्वसन व्यवस्थेवर अनिष्ट प्रभाव पडतो. अशा रुग्णाला वेळेत उपचार व गंभीर रुग्णाला ऑक्सिजन मिळाले नाहीत, तर जीव जाऊ शकतो. प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या कोरोनाचा लागण होण्याची शक्यता अधिक असते.
जोखमीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी
मधुमेह, उच्चदाब व कर्करोग असणाऱ्या रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे. संक्रमित झाल्यावर काही लक्षणे दिसताच लगेच आरटीपीआर अथवा अँटिजेन चाचणी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने उपचार सुरू करावे. डॉक्टर व प्रशासनाने सांगितलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. तणावमुक्त राहावे. वेळेवर औषधे घ्यावे, असा सल्ला जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिला.