रिक्त पदांचा आकृतीबंध जाहीर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:28+5:302020-12-26T04:23:28+5:30
नोकरभरती बंदी असल्यामुळे बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. मात्र आज ना उद्या भरती प्रकिया सुरू होईल, म्हणून बेरोजगार युवक, ...
नोकरभरती बंदी असल्यामुळे बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. मात्र आज ना उद्या भरती प्रकिया सुरू होईल, म्हणून बेरोजगार युवक, युवती मोठ्या अपेक्षेने स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यातच शासनातर्फे दोन टप्प्यात विविध विभागातील पदभरती राबविण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर सदर पदभरतील ७० टक्के पदे बाह्ययंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार नाही. त्यासोबतच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाºयांच्या नियुक्त्याही करार पद्धतीने विशिष्ट कालावधीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आस असलेल्या बेरोजगारांचे स्वप्न भंगले असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नोकरभरतीसाठी विशेष पाऊले उचलण्याची गरज असताना शासनाकडून केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांची थट्टा करण्यात येत असल्यामुळे बेरोजगारांमध्ये नाराजी उमटत आहे.