डायल ११२ वर केला कॉल अन् वाचले ‘त्या’ मुलीचे प्राण

By परिमल डोहणे | Published: July 3, 2024 01:40 PM2024-07-03T13:40:11+5:302024-07-03T13:41:43+5:30

Chandrapur : ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील प्रकार

Dialed 112 and saved 'that' girl's life | डायल ११२ वर केला कॉल अन् वाचले ‘त्या’ मुलीचे प्राण

Dialed 112 and saved 'that' girl's life

चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील २० वर्षीय मुलगी आत्महत्या करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय मालडोंगरीच्या विहिरीत उडी घेतली असून लोखंडी रॉडला अटकून असल्याची माहिती डायल ११२ वर मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून डायल ११२ वर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी लगेच ब्रह्मपुरी पोलिसांना माहिती कळवली. ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून विहिरीतील लोखंडी रॉडला लटकलेल्या मुलीची समजूत काढून तिला सुखरुप बाहेर काढले.

१ जुलै रोजी दुपारी २.४४ वाजता चंद्रपूर डायल ११२ वर ब्रह्मपुरी येथून कॉल आला. एक २० वर्षीय मुलगी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती त्यांनी दिली. डायल ११२ येथील प्रेषक डब्ल्यूपीसी सिंधू गुडधे यांनी पोलिस स्टेशन ब्रह्मपुरी येथील एमडीटीवर तो कॉल लगेच पाठवला. तेथील डायल ११२ च्या कर्तव्यावर असणारे अंमलदार हेड कॉन्स्टेबल बालाजी वाटेकर, पोलिस शिपाई पुरुषोत्तम भरडे हे लगेच घटनास्थळी गेले. त्यावेळी ती मुलगी लोखंडी रॉडला मुलगी पकडून असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते दोघेही पोलिस लगेच विहिरीत उतरले. मात्र ती मुलगी बाहेर येण्यास तयार नव्हती. पोलिसांनी तिची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केल्यानंतर ती मुलीचा मनातील आत्महत्येचा विचार बदलला. त्यानंतर तिला विहिरीच्या बाहेर काढण्यात आली. त्यानंतर त्या मुलीला तिच्या आईच्या स्वाधिन करण्यात आले. ही कारवाई डायल ११२ चे पोलिस निरीक्षक बबन फुसाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रेबनकर तसेच ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनच्या डायल ११२ च्या चमूने केली.

आपत्कालिन स्थितीत डायल ११२ वर कॉल करावा. जवळील पोलिसांची चमू लगेच आपल्या रक्षणासाठी त्या ठिकाणी पोहोचेल. कुणील डायल ११२ वर फेक कॉल करु नये, असे कॉल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते.

-धर्मेद्र फुसाटे, पोलिस निरीक्षक डायल ११२ चंद्रपूर
 

अन्यथा घडला असता अनर्थ
डायल ११२ वर कॉल येताच कर्तव्यावरील डब्ल्यूपीसी सिंधू गुडधे यांनी पोलिस स्टेशन ब्रह्मपुरी

ला कळविले अन् तेथील चमूसुद्धा लगेच घटनास्थळ गाठले. जर पाच ते दहा मिनिटे पोलिसांची चमू उशीरा पोहोचली असती तर अनर्थ घडला असता. मात्र डायल ११२ च्या चमूने दाखवलेल्या तत्परतेने त्या मुलीचे प्राण वाचले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.

Web Title: Dialed 112 and saved 'that' girl's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.