पारडगाववासीयांना डायरियाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:46 PM2019-04-15T22:46:49+5:302019-04-15T22:47:02+5:30
तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे. एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे.
एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
पारडगावची लोकसंख्या दीड हजार आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन टाक्या बनविलेल्या असून एका टाकीत बोअवेलचे तर दुसºया टाकीत भुतीनाल्यातील शुध्द केलेले पाणी सोडले जाते. त्यानंतर सर्व गावाला नळाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. परडगावत लागलेली डायरियाची साथ दूषित पाण्यामुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज उपचार करणाºया ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारपासून ही लागण काही नागरिकांना झाली असता या बाबीकडे नागरिकांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु सोमवारी सकाळपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे एकच धावपळ उडाली. सोमवारी सकाळी ११ वाजता चौगान येथील आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाल्यानंतर तपासणीअंती ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी तब्बल ३० रुग्णांना भरती करण्यात आले आहे .
पाण्याच्या नमुन्याची तपासणी नाही
पारडगाववासीयांकडून अधिक माहिती घेतली असता प्रशासनाकडून दर महिन्याला तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने घेतले जातात. परंतु या महिन्यात पाण्याचे नमुने तपासणी करण्यासाठी घेण्यात आले नसल्याचे तसेच येथील ग्रामपंचायत चपराशी यांचे निधन झाले असल्याने गत दोन महिन्यांपासून ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नसल्याचे गावकºयांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मागील सात-आठ वर्षांपासून पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात आली नसून सदर टाकीत बांबू टाकून पाहिले असता त्याठिकाणी बांबू फसतो, असेसुद्धा गावकºयांनी सांगितले.
अशा प्रकारची लागण अस्वच्छता, खानपान आणि दूषित पाणी यामुळे होत असून या सर्व रुग्णांना झालेली लागण दूषित पाण्यापासूनच झाली असावी.
- भाग्यश्री वºहाडे,
वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी.