आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचे देहावसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 04:59 AM2018-04-09T04:59:35+5:302018-04-09T04:59:35+5:30
गीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी आणि श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे प्रमुख लक्ष्मणराव नारखेडे दादा (९१) यांचे रविवारी दुपारी अड्याळ टेकडी येथे देहावसान झाले.
चंद्रपूर : गीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी आणि श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे प्रमुख लक्ष्मणराव नारखेडे दादा (९१) यांचे रविवारी दुपारी अड्याळ टेकडी येथे देहावसान झाले. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा हे त्यांचे जन्मगाव होते. १९४४ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर ते राष्ट्रसंतांच्या कार्यात रमले. पत्नीच्या निधनानंतर सर्व मालमत्ता मुलांच्या स्वाधीन करून ते तुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रेरणेमुळे अड्याळ टेकडी येथील कार्यात समर्पित झाले. श्री तुकारामदादा यांनी ९ डिसेंबर १९८९ला गीताजयंती दिनी उत्तराधिकारी म्हणून त्यांना श्री गुरुदेव तत्त्वज्ञानाची जबाबदारी सोपविली. ग्रामगीता रुजविण्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश तसेच अनेक भागांत त्यांनी प्रचार दौरे केले. ऊर्जानगर चंद्रपूर येथे ४ व ५ जानेवारी २०१५ला झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे अध्यक्ष होते.