रेशन कार्डवरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:06+5:302021-06-24T04:20:06+5:30
चंद्रपूर : गरिबांना सवलतीच्या दरात धान्य मिळावे, त्यांची दोन वेळची चूल पेटावी या उद्देशाने शासन रेशन कार्डधारकांना अल्प दरात ...
चंद्रपूर : गरिबांना सवलतीच्या दरात धान्य मिळावे, त्यांची दोन वेळची चूल पेटावी या उद्देशाने शासन रेशन कार्डधारकांना अल्प दरात धान्य देते. लाॅकडाऊनच्या काळात अडचण येऊ नये यासाठी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील नागरिकांना मोफत धान्य देण्यात आले. आताही हे धान्य दिल्या जात आहे. मात्र काही रेशन दुकानदार लाभार्थ्यांच्या हक्काचे धान्य देण्याचे टाळतात. त्यामुळे आपल्या हक्काचे धान्य मिळत नसेल तर १८००-२२-४९५० या क्रमांकावर किंवा पुरवठा विभागात तक्रार करून आपल्या हक्काचे धान्य मिळवता येते.
जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ३१ कार्डवर १० लाख ३७ हजार ७०५ नागरिकांना तर अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत १ लाख ३७ हजार १४५ कार्डच्या माध्यमातून ५ लाख ११ हजार ७०० नागरिकांना मोफत धान्य दिल्या जाते. दरम्यान, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गतही मोफत धान्य पुरविल्या जाते. मात्र काही रेशन दुकानदार लाभार्थ्यांची दिशाभूल करीत एका महिन्याचे धान्य दुसऱ्या महिन्यात तसेच ई-पासवर अंगठा घेऊनही काही वेळा धान्यच देत नसल्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकांनी इ-पाॅसवर अंगठा मारल्यानंतर धान्य उचल करावी, जर अंगठा मारूनही रेशन दुकानदार धान्य देत नसेल त्याची तक्रार जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे करता येते.
बाॅक्स
एकूण कार्ड ४,५७,३२९
बीपीएल २,६१,०३१
अंत्योदय १,३७,१४५
केशरी ५९,१५३
बाॅक्स
धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
लाॅकडाऊनपूर्वी इ-पाॅस मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा घेण्यात येत होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मे महिन्यामध्ये इ-पाॅस मशीवर रेशन दुकानदारांचाच अंगठा घेण्याचा निर्णय झाला. याचा दुरुपयोग अनेक दुकानदारांनी घेतल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय कार्डधारक तसेच प्राधान्यगटातील नागरिकांना मोफत धान्य दिल्या जाते. आता पुन्हा लाभार्थ्यांच्याच अंगठ्यावर धान्य दिल्या जात आहे.
बाॅक्स
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा?
शासन अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील नागरिकांना अल्पदरात राशन देते. लाॅकडाऊनपासून तर मोफत धान्य देत आहेत. मात्र एपीएल कुटुंबाला काहीच मिळत नाही. एपीएल कुटुंबातील नागरिकांनाही धान्य द्यावे, म्हणजे, लाॅकडाऊनसारख्या दिवसामध्ये दिलासा मिळेल.
-कोमल पिंपळशेंडे
चंद्रपूर
कोट
कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून रोजगार गेला आहे. त्यातच रेशनचे धान्यही मिळत नाही. त्यामुळे शासनाने अंत्योदय तसेच अन्य कुटुंबाप्रमाणे एपीएल कुटुंबांना अल्पदरात राशन पुरवावे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत सर्वांनाच धान्य द्यावे. म्हणजे, गरिबांना लाॅकडाऊनसारख्या काळामध्ये प्रत्येकांना दिलासा मिळेल.
सुरेश मडावी, चंद्रपूर