विचारांच्या सक्षमीकरणासाठी मनाचे डाएट हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:42+5:302021-04-21T04:28:42+5:30

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांच्या पुढाकाराने मानसिक आरोग्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या ...

The diet of the mind is needed for the empowerment of thoughts | विचारांच्या सक्षमीकरणासाठी मनाचे डाएट हवे

विचारांच्या सक्षमीकरणासाठी मनाचे डाएट हवे

Next

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांच्या पुढाकाराने मानसिक आरोग्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कोरोना महामारीमुळे सर्वांनाच विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नैराश्यपूर्ण वातावरण व मानसिक तणाव निर्माण होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी व नवी ऊर्जा देण्यासाठी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची भूमिका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांनी यावेळी स्पष्ट केली. कार्यक्रमात चितोडकर यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘माझ्यातील मी साठी जीवनाचा शिल्पकार व्हावे’, या विषयावर मार्गदर्शन करताना पॉझिटिव्ह भावनेतून विचार करावा, असे आवाहन केले. या मार्गदर्शन कार्यक्रमात अनेकजण सहभागी झाले होते.

Web Title: The diet of the mind is needed for the empowerment of thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.