महिलांपुढे बचत गटाचे कर्ज फेडण्याचा बिकट प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:48+5:302021-05-19T04:28:48+5:30

मध्यमवर्गीय तसेच गरीब कुटुंबांना सोयीचे व्हावे म्हणून खासगी बचत गटामार्फत महिलांना पंधरा ते वीस हजार रुपये अल्प मुदतीचे कर्ज ...

The difficult question of repaying the debt of the self-help group in front of women | महिलांपुढे बचत गटाचे कर्ज फेडण्याचा बिकट प्रश्न

महिलांपुढे बचत गटाचे कर्ज फेडण्याचा बिकट प्रश्न

Next

मध्यमवर्गीय तसेच गरीब कुटुंबांना सोयीचे व्हावे म्हणून खासगी बचत गटामार्फत महिलांना पंधरा ते वीस हजार रुपये अल्प मुदतीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात महिलांनी खासगी बचत गटाचे कर्ज उचलले आहे. कोरोना संसर्ग पसरण्यापूर्वी महिलांचा सर्व व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र कोरोना व लॉकडाऊनमुळे रोजचा खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यातच कर्जाचे हप्ते भरावे लागत आहे. त्यामुळे सर्व कुटुंबच चिंतेत सापडले आहे. शहर व तालुक्यातील आंध्र गटातून कर्ज उचलले आहे. त्याचे कर्ज हप्तेवारी, महिनेवारी या स्वरूपात असते. लॉकडाऊनच्या आधीपर्यंत व नंतरही कर्जदार महिलांनी या खासगी गटातून वेळेवर कर्ज फेडले आहेत. मात्र मागील वर्षीपासून कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कर्जाचे हप्ते भरावे कसे, हा प्रश्न महिलांना पडला आहे.

Web Title: The difficult question of repaying the debt of the self-help group in front of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.