आत्मविश्वासाने अवघड वाट सोपी होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:38 PM2018-06-04T23:38:06+5:302018-06-04T23:38:18+5:30
विद्यार्थी जीवन प्रत्येकांसाठी संधी असते. आयुष्याच्या वळणावर अनेक वाटा निर्माण होतात. त्यात कही खडतर तर काही सहज जाता येणाऱ्या सोप्या असतात. मात्र ध्येय गाठण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, कामाची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने चाललेली अवघड वाट सोपी होते व सार्थकी लागते, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : विद्यार्थी जीवन प्रत्येकांसाठी संधी असते. आयुष्याच्या वळणावर अनेक वाटा निर्माण होतात. त्यात कही खडतर तर काही सहज जाता येणाऱ्या सोप्या असतात. मात्र ध्येय गाठण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, कामाची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने चाललेली अवघड वाट सोपी होते व सार्थकी लागते, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले.
बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. नागरी सेवा परीक्षेची वाट निवडणे आव्हनात्मक असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासमोर पेच उभे होतात. परंतु, ध्येय प्राप्त करण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी लागते. इच्छाशक्तीला प्रयत्नांचे बळ द्यावे लागते. स्पर्धा परीक्षेची वाट यातून सुकर होते. परीक्षेदरम्यान अनेकवेळा अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र सकारात्ममक विचार करून मार्गक्रमण ध्येयपूर्ती सुरू ठेवावे लागते. प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नातून जीवनात संधी प्राप्त होते, असा आशावाद क्रांती डोंबे यांनी विद्यार्थ्यामध्ये जागविला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत कन्नमवार, दयालवार, गोपाल पोडे, देवानंद शेंडे, शुभम भोयर यांची उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी म्हणून येथील सार्वजनिक वाचनालयात अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक पुस्तके लोकसहभागातून देण्यासाठी समाज बांधवांनी देणगी दिली.
कार्यक्रमाचे संचालन राजू कोंडेकर यांनी केले. तर आभार पालिता उमरे यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.