महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘डिजिटल साक्षरता’अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:55+5:30

डिजिटल युगाची गरज लक्षात घेता महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी ‘डिजिटल साक्षरता अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान स्वयंसेवी संस्थामार्फत राज्यभरात १०० कार्यशाळा घेवून महिलांना प्रशिक्षित केले जाईल. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.

'Digital Literacy' campaign for women's empowerment | महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘डिजिटल साक्षरता’अभियान

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘डिजिटल साक्षरता’अभियान

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला आयोगाचा उपक्रम । तज्ज्ञ देणार विविध विषयांचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डिजिटल युगाची गरज लक्षात घेता महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी ‘डिजिटल साक्षरता अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान स्वयंसेवी संस्थामार्फत राज्यभरात १०० कार्यशाळा घेवून महिलांना प्रशिक्षित केले जाईल. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.
एक महिला शिकली की ती संपूर्ण घराला शिक्षित करते आणि सोबत इतर चार घरातील महिलांना शिक्षित करते. डिजिटल साक्षरता ही काळाची गरज आहे. म्हणूनच महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी करायचे असेल तर डिजिटल साक्षर करणे गरजेचे आहे. डिजिटल साक्षरता म्हणजे रोजच्या जीवनात अर्थपूर्ण कार्य करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान समजण्याची आणि ते वापरण्याची कुठल्याही महिलेची, व्यक्तीची किंवा समाजाची क्षमता, भारताला डिजिटल सक्षम समाज बनविणे या महत्त्वाकांक्षी उद्देशाने सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यासाठी महिला आयोगातर्फे विविध स्वयंसेवी संस्था व महाविद्यालयाची मदत घेतली जाणार आहे. या संस्था राज्यभरात ५०० कार्यशाळांचे आयोजन करून महिलांना डिजिटली सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक कार्यशाळेप्रमाणे ४० हजार रूपये अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अभियानात ग्रामीण भागातील महिलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
कार्यशाळांमधून ग्रामीण महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाणार आहे. कार्यशाळेत डिजिटल क्षेत्रातील तज्ञांकडून महिलांमध्ये डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागात जाऊन बचत गटातील स्मार्ट फोनधारक महिलांना कार्यशाळेत सहभागी करून घेतले जाणार आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप
केवळ तोंडी मार्गदर्शनापेक्षा प्रॅक्टिकल लर्निग्जवर या कार्यशाळेत भर दिला जाणार आहे. स्मार्टफोनसारख्या डिजिटल उपकरण व इंटरनेटचा कार्यक्षम वापर, यासोबत दैनंदिन उपयोगात येणारे ‘उमंग’, ‘आपले सरकार’, ‘ई-जीईएम’, ‘आयआरसीटीसी’, ‘डिजीलॅकर’ असे महत्त्वपूर्ण मोबाईल अ‍ॅप्स आणि डिजिटल पेमेंटसाठी ‘भीम अ‍ॅप’, ‘फोन पे’ अशा अ‍ॅप्सचा उपयोग तसेच सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Web Title: 'Digital Literacy' campaign for women's empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.