डिजिटल तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल
By admin | Published: March 27, 2017 12:44 AM2017-03-27T00:44:48+5:302017-03-27T00:44:48+5:30
शासनाने डिजिटल युगात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.
संदीप गोडशेलवार : तिरवंजा येथे डिजिटल शाळेचे उद्घाटन
घोडपेठ : शासनाने डिजिटल युगात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. डिजिटल शाळेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल, असा आशावाद भद्रावतीचे सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी संदिप गोडशेलवार यांनी व्यक्त केला.
भद्रावती पं.स. अंतर्गत घोडपेठ बिटातील तिरवंजा (मोकासा) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावतीचे गट शिक्षणाधिकारी रमण गुज्जनवार उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य अश्विनी ताजणे, सरपंच सुंदरा कुळमेथे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता चन्ने, केंद्रप्रमुख मारोती रायपुरे, उपसरपंच गणपत कारेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू डाहुले, रविंद्र कारेकर, भास्कर ताजणे, संजय राजूरकर, राजू पेटकर, अर्चना पिंगे, माधुरी चौधरी, संजय कुळमेथे, सरला चांदेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अल्का ठाकरे यांनी तर संचालन जयश्री कांबळे यांनी केले. वैशाली वडेट्टीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत रामटेके, मांचामवार, दिगांबर गोकटे यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)
येन्सा शाळेतील डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन
वरोरा : तालुक्यातील येन्सा जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन सोहळा शुक्रवारला पार पडला. डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन वरोरा पं.स.सभापती रोहीनी देवतळे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य सुनंदा जिवतोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी ओमप्रकाश यादव, पं.स. सदस्य संजीवनी भोयर, शाळा व्य.स.चे अध्यक्ष बाबाराव घोटेकर, उपाध्यक्ष पंढरी पेंदाम, विठाबाई झाडे, पो.पा. मधुकर काळे, ग्रा. प. सदस्य शारदा चौधरी, अर्चना शेडे, मोनाली अवघडे, शिता चंदनबटवे, मनोज बोरेकर, राष्ट्रपाल शेंडे म. रा. म. पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष आशिष घुमे, मुख्याध्यापक नगाजी साळवे, ग्रामसेवक बिशन, ग्यानीवंत गेडाम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नगाजी साळवे यांनी, कार्यक्रमाचे संचालन किशोर गोवारदिपे यांनी केले, तर आभार अल्का बडवाईक यांनी मानले.