धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सज्ज
By admin | Published: October 11, 2016 12:52 AM2016-10-11T00:52:14+5:302016-10-11T00:52:14+5:30
६० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा १५ व १६ आॅक्टोबरला उत्साहात साजरा होणार असून या सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे.
चंद्रपूर : ६० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा १५ व १६ आॅक्टोबरला उत्साहात साजरा होणार असून या सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूरच्या वतीने दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा आयोजित करण्यात येत असून यावर्षी ही दोन दिवस उत्तासाहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
१५ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता विश्वशांती बंधुत्व प्रेरीत वाहनासह शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही मिरवणूक प्रारंभ होऊन दीक्षाभूमीवर विसर्जित होणार आहे. सायंकाळी ६ वाजता धम्मध्वजारोहण होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची उपस्थिती राहणार आहे. यानंतर धम्मज्योत प्रज्वलन होणार असून भदंत नंदवर्धनबोधी महाथेरो अध्यक्षस्थानी तर वण्णास्वामी महाथेरो, भिक्खू धम्मनाग थेरो यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संध्याकाळी ६.४० वाजता उद्घाटन होणार असून भदंत नंदवर्धन बोधी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, भदंत डॉ. वण्णास्वामी महाथेरो, भदंत डॉ.मेतानंद महाथेरो, भदंत संदावरा महाथेरो, भदंत सयादेव महाथेरो, भदंत उत्तम महाथेरो, भदंत सुंदरा महाथेरो, भदंत ज्योतीला महाथेरो, भदंत तेजानिया महाथेरो, भदंत अगासरा महाथेरो, भदंत अंगुरो महाथेरो, भदंत विरिया महाथेरो, भदंत जिताराम महाथेरो, भिक्खू धम्मनाग थेरो, भिक्खू धम्मघोष मेत्ताथेरो आदी उपस्थित राहणार आहेत.
रात्री ८ वाजता जागर समतेचा हा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. १६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता तथागत भगवान सम्यक सबुद्ध आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातूकलशासह आणि पथसंचालनासह मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १.३० वाजता सामुहिक बुद्धवंदना आणि धम्मप्रवचन होणार असून धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई अध्यक्षस्थानी राहतील, यावेळी प्रा.डॉ. नंदवर्धन बोधी, डॉ.वण्णास्वामी महाथेरो, भिक्खू धम्मनगा महाथेरो, भिक्खू धम्मसारथी, भिक्खू बोधीरत्न, भिक्खू नागवंश, भिक्खू नागाघोष, आदी उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता मुख्य समारंभ होणार आहे.
मुख्य समारंभाला येणार रामदास आठवले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून होझान अलन सेनाईके केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार नाना शामकुळे, अल्पसंख्याकविभागाचे प्रधानसचिव शाम तागडे, धम्मचारी मैत्रेयनाथ, धम्मचारी वीरधधम्म, जॅनस आर्सस आदींची उपस्थिती राहणार आहे.