दिंडोरा बॅरेजच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:57 PM2018-10-31T22:57:04+5:302018-10-31T22:57:47+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे.

Dindora Barrage's work starts after Diwali | दिंडोरा बॅरेजच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात

दिंडोरा बॅरेजच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर यांच्या उपस्थितीत बैठक : जलसंपदा विभागाच्या सचिवांची घोषणा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे. तथापि, विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मोबदलादेखील दिवाळीनंतर लगेच दिला जाईल, अशी घोषणा जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत केली.
२००२ ला मंजूर झालेला हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. तथापि आता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ना.हंसराज अहीर यांनी याप्रकरणी तोडगा काढला असून विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भरीव मोबदला देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्व स्थितीपेक्षा अधिक क्षमतेने शेतकºयांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पातून सिंचनासाठी आता ५७ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. पूर्वी या प्रकल्पातून केवळ १९ दलघमी पाणी देण्याचे ठरले होते. तथापि औद्योगिक वापरासाठी आता पाणीसाठा कमी करण्यात आला असून सिंचनासाठी मात्र मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.
चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असणाºया या प्रकल्पामुळे तीनही जिल्ह्यातील शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. तीनही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना नव्या धोरणानुसार मोबदला उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अनेक शेतकºयांनी न्यायालयीन प्रक्रियाही सुरू केली होती. त्यामुळे हा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. तथापि, राज्य शासनाने सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाला पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूणच सिंचन क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शेतकºयांनी सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाचा वापर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आजच्या बैठकीला शेतकºयांची देखिल उपस्थिती होती. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता बलवंत स्वामी उपस्थित होते.

Web Title: Dindora Barrage's work starts after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.