कांदा लागवडीतून ’गुणवंत’ला मिळाली दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:47 AM2018-03-30T00:47:45+5:302018-03-30T00:47:52+5:30

मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत.

The direction of 'quality' from onion cultivation | कांदा लागवडीतून ’गुणवंत’ला मिळाली दिशा

कांदा लागवडीतून ’गुणवंत’ला मिळाली दिशा

Next
ठळक मुद्देबेरोजगारांना प्रेरणा : आष्टा येथील युवकाने दिला पारंपरिक शेतीला फ ाटा

विराज मुरकुटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत. मात्र, आष्टा गावातील गुणवंत भालचंद्र या उच्च शिक्षित युवकाने पारंपरिक शेती टाळून कांदा लागवडीचा मार्ग स्वीकारला.
गुणवंत भालचंद्र मोरे यांनी शेती व्यवसायालाच केंद्रबिंदू मानले. गुणवंतला चक पोंभुर्णा शिवारात पाच एकर शेती आहे. यापैकी केवळ अर्धा एकरात महाबिजकडून ‘किरण’ नावाचे कांदा बियाणे लागवड करून नवा मार्ग स्वीकारला. रासायनिक खताचा वापर न करता केवळ सेंद्रिय बॉयोडॉयनॉमिक खताचा वापर केला. हा कांदा लाल रंगाचा असून पीक मोठ्या डौलाने उभे आहे. कांद्याची शेती ते चार वर्षांपासून करीत आहेत. त्यासोबतच भेंडी, धान, हरभरा, कोंथीबीर व भाजीपाला पिकांचे ेउत्पादनही घेत आहे. त्यांना कुटुंबियाचीही मदत आहे.
शासनाकडून सिंचनाची योजना नसताना केवळ शेतातीलच छोट्याशा विहिरीतूनच पाणी दिले जात आहे. त्यांनी तुषार सिंचन लावला असून दरवर्षी समाधानकारक पीक हाती येत आहे. अर्ध्या एकरात दरवर्षी ४० क्विंटल कांद्याचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत ८० हजार किंमतीचे उत्पन्न गुणवंतला मिळाले आहे. सहा ते सात हजारांचा खर्च वजा केल्यास ७३ हजारांचा नफा मिळाला, अशी माहिती गुणवंतने दिली.
कांदा लागवडीसाठी कृषी कार्यालय पोंभुर्णा येथून बियाणे मिळविले. यासाठी कृषी सहायक ए. डी. ताले यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. कांदा उत्पादन निघाल्यानंतर पोंभुर्णा येथील बाजारपेठ व सोबतच जिल्ह्यातील तालुका बाजारातही लाल कांद्याची विक्री केली जात आहे. कांदा लागवडीची ही शेती अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी आहे.
केवळ पारंपरिक पीक न घेता बदलत्या काळानुसार शेती केल्यास अडचणीवर मात करता येवू शकते. त्यासाठी मानसिकतेमध्ये बदल करावा. शासनाच्या योजनांचाही लाभ घ्यावा, अशी प्रतिक्रि या गुणवंतने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
बॉयोडायनॅमिक खत म्हणजे काय?
पीक काढल्यानंतर शेतात तणस लाखोळीचे कुटार, गव्हांडा, घसकट व शेतातून निघालेला काडीकचरा एकत्र कुजविल्यास बॉयोडायनॅमिक सेंद्रिय खत तयार होते.

Web Title: The direction of 'quality' from onion cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा