मतिमंद भावंडांना मिळवून दिले अपंगत्वाचे प्रमाणपत्र
By Admin | Published: October 3, 2015 12:56 AM2015-10-03T00:56:46+5:302015-10-03T00:56:46+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या शुक्ला वाघ यांच्या दोन मतिमंद मुलगा...
चंद्रपूर : गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या शुक्ला वाघ यांच्या दोन मतिमंद मुलगा व मुलीला शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचार यांनी पाठपुरावा करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून दिले. अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामुळे गरीब मतिमदांना शासकीय योजनाचा लाभ घेता येणार आहे.
वैद्यनगर येथील शुक्ला वाघ यांना सुष्मा ही १५ वर्षाची तर शुभम हा १२ वर्षाचा मुलगा आहे. दोघेही ८८ टक्के मतिमंद असल्याचे चालता येत नाही. दोघांचाही पालन-पोषण आई वडिलांना करावे लागते. वाघ यांची परिस्थिती गरीब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही मतिमंद मुलांना प्रमाणपत्र मिळावे यासाठी शुक्ला वाघ प्रशासनाकडे चकरा मारत होते. मात्र त्यांना कोणीही मदत केली नाही. मतिमंद प्रमाणपत्र अभावी त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता आला नाही. ही बाब माहीत होताच शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारोे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे जावून दोन्ही मतिमंद भावंडांना प्रमाणपत्र मिळवून दिले. यासाठी अर्चिश राऊत, शशी शंभरकर, आनंद इंगळे, नितूसिंग बावरे यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)