अपंगांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:24 AM2019-03-04T00:24:15+5:302019-03-04T00:25:14+5:30

जिल्ह्यातील अपंग बांधवांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पुर्ततसेसाठी प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. तसेच सदर मागण्या त्वरीत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.

Disability hits the District Collectorate | अपंगांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अपंगांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Next
ठळक मुद्देप्रहार संघटना : मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील अपंग बांधवांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पुर्ततसेसाठी प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. तसेच सदर मागण्या त्वरीत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.
शासनाच्या वतीने अपंगासाठी विविध स्तरावर अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अपंगांना योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच स्थानिक पातळीवर योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अपंग बांधवाना त्रास सहन करावा लागतो. अपंगांना समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणारे बँक कर्जामधील अटी रद्द कराव्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सभ्य वागणूक देण्यात यावी, गैरवर्तणूक करणाऱ्यावर कार्यवाही करावी, पंतप्रधान आवास योजनेत अपंगांना प्रथम प्राधान्याचा शासन निर्णय असताना लाभ न देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी, अपंगांना २१ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला द्यावा, अपंगांना बीपीएल कॉर्ड द्यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी प्रहारचे राहुल पांडव, अनिल लोणारे , प्रशांत भोयर, सतीश बिडकर, नितीन नगरकर, रफिक कुरेशी , महासिंग कांबळे, रामचंद्र जेणेकर, गडचिरोली जिल्हाउपाध्यक्ष विलास धंदरे, शुभांगी गराटे आदी उपस्थित होते.

Web Title: Disability hits the District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.