सरडपारवासी विकास योजनांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:59 PM2019-02-01T22:59:11+5:302019-02-01T22:59:31+5:30
तालुक्यातील सरडपार येथे शासनाच्या विविध योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यातील सरडपार येथे शासनाच्या विविध योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून दिला आहे.
सरडपाड येथील नागरिकांना स्वच्छतागृह व घरकूल योजनेचा लाभ मिळाला नाही. पात्र लाभार्थी वंचित आहेत. मागील चार वर्षांपासून विकास योजना न आल्याने कामे ठप्प झाली. चिमूर ग्रामपंचायतचे रूपांतर सन २०१५ ला नगर परिषद मध्ये करण्यात आले. त्यावेळी काग गट ग्रामपंचायतचे विलीनीकरण नगर परिषदमध्ये झाले. मात्र त्यावेळी गट ग्रा. पं. अंतर्गत असलेल्या सरडपार गावाला म्हसली ग्रामपंचायतला तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आले मात्र सदर गावांची कोणतीही माहिती आजपर्यंत आॅनलाईन झाली नाही. परिणामी, नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरडपार गावाची लोकसंख्या सुमारे ५५० आहे.
सरडपारला तात्पुरता स्वरूपात ग्रामपंचायत म्हसलीला जोडण्यात आले. पण उपयोग झाला नाही. शासनस्तरावरून आॅनलाईन न झाल्याने आॅनलाईन माध्यमातून मिळणाºया शासकीय योजना, जन्म दाखले, कर आकारणी, जॉब कार्ड आणि इतर सर्व कागदपत्रे मिळणे बंद झाले. गावकºयांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. योजनांसाठी पात्र असूनही आर्थिक व सामाजिक विकास करण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.
यावर तातडीने तोडगा काढून योजनांचा लाभ मिळवून दिला नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांच्याकडे निवेदनातुन देण्यात आला आहे यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेता सतीश वारजूकर, पंचायत समितीचे गटनेता रोशन ढोक, पं. स. सदस्य लता पिसे, अरूण पिसे, सामाजिक कार्यकर्ता सुधीर जुमडे, रवींद्र सहारे, बालाजी मेश्राम, अक्षय श्रीरामे, पवन सहारे, आकाश खडके, वासुदेव गुडधे, सोमेश्वर रंधये, उत्तम धारणे, विनोद वाकडे, दयाराम कुंभरे, प्रमोद वाकडे, भगवान शेंडे व सरडपार येथील बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.