चुना टाकून गळती थांबविली

By admin | Published: January 13, 2015 10:56 PM2015-01-13T22:56:40+5:302015-01-13T22:56:40+5:30

पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या पात्रात रसायनाने भरलेला टँकर पडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि बल्लारपूर प्रोटिन लि. बामणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन

Discard leak and discard leak | चुना टाकून गळती थांबविली

चुना टाकून गळती थांबविली

Next

सुचविल्या उपाययोजना : रसायन टँकर अपघात
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या पात्रात रसायनाने भरलेला टँकर पडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि बल्लारपूर प्रोटिन लि. बामणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन रसायन गळतीच्या नियंत्रण मिळविले.
सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गोंडपिपरी व पोंभुर्णा तहसीलच्या हद्दीवरील अंधारी नदीच्या पात्रात कान्सस्ट्रेटेड हायड्रोक्लोरीक अ‍ॅसीड या रसायनाने भरलेला टँकतरचा अपघात झाला. गोंडपिपरीचे तहसीलदार मल्लीक विराणी तसेच ठाणेदार बासनवार, नायब तहसीलदार बन्सोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच जिल्ह्यातील हिन्दूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड, आमआयडीसीचे सेफ्टी आॅफिसर आशिषकुमार तसेच मल्टीआॅर्गेनिक्स कंपनी प्रा.लिमिटेडचे प्रबंधक अलिम खान यांच्यासोबत रसायन हाताळणाऱ्या अनुभवी तज्ज्ञ टिमला घटनास्थवार आपत्ती टाळण्याकरिता पाचारण करण्यात आले. वेळीच उपाययोजना केल्यामुळे संभावित आपत्तीचा धोका टळला. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Discard leak and discard leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.