आगामी तीन महिन्यांच्या वीज बिलात सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:35+5:302021-06-11T04:19:35+5:30
ब्रह्मपुरी : काेराेनाच्या दसऱ्या लाटेने सर्वांचे नुकसान झाले असून सामान्यांच्या हाताला काम नसल्याने विजेचे वाढलेले बिल कसे भरावे, ...
ब्रह्मपुरी : काेराेनाच्या दसऱ्या लाटेने सर्वांचे नुकसान झाले असून सामान्यांच्या हाताला काम नसल्याने विजेचे वाढलेले बिल कसे भरावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अशातच मागील वर्षात सरकारने आश्वासन देऊनसुद्धा कोणतीही मदत न करता उलट तीन महिन्यांचे एकाच वेळी बिल दिल्याने जनतेची दिशाभूल केली. आगामी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या वीज बिलात १० ते २० टक्के सवलत देऊन जनतेला दिलासा द्यावा, यासाठी कृतिसंसाधन समिती ब्रह्मपुरीद्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले. यावेळी मागील वर्षात कंपनीने जास्त आकारलेली रक्कम चालू बिलातून वजा करावी, माेहफुलापासून मद्यनिर्मिती तयार करण्याचे मागेल त्या ग्रामीणाला परवाने द्यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष यशवंतराव खोब्रागडे, स्वप्नील रामटेके, ॲड. क्षितिज मेंढे, उमेश बागडे, माेतीलाल देशमुख, पद्माकर रामटेके, अनिल उंदीरवाडे, राजेंद्र माेटघरे उपस्थित होते.
===Photopath===
100621\1134-img-20210610-wa0004.jpg
===Caption===
नायब तहसीलदार यांना निवेदन देताना