इटियाडोह धरणाच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

By admin | Published: November 26, 2015 12:53 AM2015-11-26T00:53:38+5:302015-11-26T00:53:38+5:30

गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोर येथून जवळच असलेल्या बोंडगाव देवी परिसरातील वंचित असलेल्या १५ ते २० गावांना ...

To discuss the water of Itiyadoh dam with chief ministers | इटियाडोह धरणाच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

इटियाडोह धरणाच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

Next

रामदास आठवले : शिष्टमंडळाला आश्वासन
चंद्रपूर : गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोर येथून जवळच असलेल्या बोंडगाव देवी परिसरातील वंचित असलेल्या १५ ते २० गावांना इडियाडोह धरणाचे पाणी पुणविण्यात यावे या मागणीसाठी शिष्टमंडळाने आरपीआय (आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या निवासस्थानी भेटून देऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाणी मिळवून देऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंतराव उके यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाची निर्मिती सन १९६५ साली करण्यात आली. १९७३ पासून धरणाचे पाणी शेतीसाठी सुरू करण्यात आले. धरणाच्या पाण्याखालील क्षेत्र ६३.५० दशलक्ष चौ.मी. असून क्षमता ३८१.५८७ दशलक्ष घनमिटर एवढी आहे. सदर धरणाचे पाणी अर्जूनी मोर पासून ते गडचिरोली जिल्ह्यात ८० ते ९० किमीचा प्रवास करीत आरमोरीपर्यंत शेतीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु धरणापासून जवळच असलेल्या अर्जूनी/मोर तालुक्यातील बोंडगाव देवी परिसरातील १५ ते २० खेडेगावांना धरणाच्या पाण्यापासून मागील ३० वर्षांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
खा. रामदास आठवले यांना शिष्टमंडळाने निवेदन मागणी केली यावेळी व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंतराव उके, उपसरपंच माधोराव झोळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष राजू ठवरे, सुभाष रामटेके, संजय बुटले, कमलेश रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. गावाच्या पाणी प्रशासनाबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा करु असे रामदास आठवले यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: To discuss the water of Itiyadoh dam with chief ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.